युवक बिरादरीच्या परीक्षेमध्ये
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:21 AM2021-01-20T04:21:19+5:302021-01-20T04:21:19+5:30
श्रीरामपूर : युवक बिरादरीच्या वतीने देण्यात आलेल्या सामान्य ज्ञानाच्या परीक्षेत जिल्ह्यातील पाच विद्यार्थ्यांनी बाजी मारली. त्यांना राष्ट्रीय युवा भूषण ...
श्रीरामपूर : युवक बिरादरीच्या वतीने देण्यात आलेल्या सामान्य ज्ञानाच्या परीक्षेत जिल्ह्यातील पाच विद्यार्थ्यांनी बाजी मारली. त्यांना राष्ट्रीय युवा भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. विजेत्यांमध्ये आस्था चौधरी, सार्थक कोकणे, सत्यम जाधव, ज्ञानेश्वर जंगले व प्रसाद पवार यांचा समावेश आहे. विद्यार्थ्यांना तहसीलदार प्रशांत पाटील, उपअधीक्षक सोहेल शेख, शिक्षक बाळासाहेब साबळे, पिंकी ठक्कर, विलास मांढरे आदींचे मार्गदर्शन लाभले. सामान्य ज्ञानावर आधारित ही स्पर्धा ऑनलाइन होती. त्यात १५० गुणांचे मानांकन होते. त्यानंतर तज्ज्ञ व्यक्तीसमोर मुलाखत झाली. देशभरातून गुणवत्तेनुसार २८ जणांची या पुरस्कारांसाठी निवड झाली.
युवक बिरादरी संस्थापक क्रांतीभाई शहा, अध्यक्ष अभिषेक बच्चन, आशुतोष शिर्के, संयोजक स्वरा शहा, सुनील वालावलकर, प्रशिक्षक पंकज इंगोले, अमेय पाटील, प्रसन्ना शिंदे, सुनील साळवे, के. के. आव्हाड, प्रमोद पत्की, चेतन लोखंडे, संतोष जाधव, अजय घोगरे, संजय जोशी, भरत कुंकुलोळ, साहेबराव घाडगे आदींनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.
---------------