रायसोनी महाविद्यालयात दोनदिवसीय चर्चासत्र उत्साहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 1, 2021 04:21 AM2021-04-01T04:21:05+5:302021-04-01T04:21:05+5:30

पहिल्या दिवशी चर्चासत्राची सुरुवात एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वरिष्ठ प्रा. डॉ. किशोर वाघ यांच्या अभिभाषणाने झाली. चर्चासत्राच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य ...

Excitement over a two-day seminar at Raisoni College | रायसोनी महाविद्यालयात दोनदिवसीय चर्चासत्र उत्साहात

रायसोनी महाविद्यालयात दोनदिवसीय चर्चासत्र उत्साहात

पहिल्या दिवशी चर्चासत्राची सुरुवात एआयएसएसएमएस अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वरिष्ठ प्रा. डॉ. किशोर वाघ यांच्या अभिभाषणाने झाली. चर्चासत्राच्या सुरुवातीला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयकुमार जयरामन यांनी प्रमुख पाहुण्यांचे स्वागत केले. डॉ. संदीप कुमार यांनी 'बायोमास : अक्षय ऊर्जास्रोत' यावर सादरीकरण केले. तसेच डॉ. किशोर वाघ यांनी 'नावीन्य आणि भारत' यावर सादरीकरण केले व अभियांत्रिकी क्षेत्रात संशोधनाचे महत्त्व सांगितले. प्रमुख वक्त्यांनी ‘संशोधन म्हणजे काय व त्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी तसेच कार्यप्रणाली’ समजावून सांगितली. २७ मार्च रोजी आय.आय. टी., मुंबईचे यांत्रिकी विभागाचे वरिष्ठ प्रा. डॉ. प्रशांत दाते यांनी ‘प्रगत उत्पादन प्रक्रिया व आयओटी’ यावर सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले. चर्चासत्रासाठी संपूर्ण भारतामधून ८४ शोधनिबंध आले होते. त्यांपैकी निवडक ४७ शोधनिबंधांना सादर करण्याची संधी देण्यात आली. शोधनिबंध सादर करण्यासाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंग प्रणालीचा उपयोग करण्यात आला.

चर्चासत्राचे संयोजन महाविद्यालयाचे उपप्राचार्य व स्थापत्य विभागप्रमुख प्रा. मोहन शिरसाट यांनी केले. चर्चासत्रासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयकुमार जयरामन, सर्व विभागप्रमुख, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. चर्चासत्रासाठी संस्थेचे प्रमुख सुनील रायसोनी यांचे मार्गदर्शन लाभले.

Web Title: Excitement over a two-day seminar at Raisoni College

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.