शिवतेज विद्यालयात महिला दिन उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:20 AM2021-03-14T04:20:05+5:302021-03-14T04:20:05+5:30
तिसगाव : श्री क्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथील शिवतेज विद्यालयाच्या पुढाकाराने ग्रामीण स्तरावर प्रथमच राष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन करण्यात ...
तिसगाव : श्री क्षेत्र मढी (ता. पाथर्डी) येथील शिवतेज विद्यालयाच्या पुढाकाराने ग्रामीण स्तरावर प्रथमच राष्ट्रीय महिला दिनाचे आयोजन करण्यात आले. महिला ग्रामपंचायत सदस्या, देवस्थानच्या विश्वस्त, शालेय शिक्षिका, आशा सेविका आदींना निमंत्रित करण्यात आले होते.
कानिफनाथ देवस्थानच्या सचिव विमल मरकड अध्यक्षस्थानी होत्या. कामगार तलाठी पल्लवी भराटे, ग्रामपंचायत सदस्या कांताबाई मरकड, वैशाली मरकड, अर्चना मरकड यांच्या हस्ते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ग्रामपंचायत सदस्या विधिज्ञ मोनिका पोळ यांनी नारीशक्तीची महती सांगितली. त्यांनी बालविवाह कायदा, हुंडाबंदीबाबतही माहिती दिली. तलाठी पल्लवी भरारे यांनी भारतीय संस्कृती, वेशभूषा पद्धतीबाबत माहिती दिली.
सुरैय्या शेख, मुस्कान शेख या विद्यार्थिनींनी प्रकट केलेले लेकीचे मनोगत भावस्पर्शी ठरले. भैरवनाथ शिक्षण ज्ञान प्रसारक मंडळाच्या सचिव वंदना मुखेकर यांनीही महिलांशी ऑनलाइन संवाद साधला. रुक्मिणी चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. विद्यालयाचे समन्वयक बाळासाहेब मरकड यांनी आभार मानले.