अकोले तालुक्यात गिधाड, चित्रांग नायकूळ, खवल्या मांजराचे अस्तित्व

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 6, 2019 12:48 PM2019-10-06T12:48:35+5:302019-10-06T12:52:01+5:30

कळसूबाई हरिश्चंद्रगड ही अभयारण्य निसर्गाच्या अनमोल ठेव्याबरोबरच विविध दुर्मिळ वन्यजीवांनी हाऊसफुल झाले आहेत. राज्यातून हद्दपार झालेले गिधाड आणि अन्य वन्यजीवांची रेलचेल असल्याने पर्यटनाबरोबर आता वन्यजीव अभ्यासकांना हे अभयारण्य पर्वणीच ठरणार आहे.  

The existence of a vulture, Chitrang Naikul, Khawaly cat in Akole taluka | अकोले तालुक्यात गिधाड, चित्रांग नायकूळ, खवल्या मांजराचे अस्तित्व

अकोले तालुक्यात गिधाड, चित्रांग नायकूळ, खवल्या मांजराचे अस्तित्व

संडे विशेष । मच्छिंद्र देशमुख ।  
कोतूळ : तालुक्यातील कळसूबाई हरिश्चंद्रगड ही अभयारण्य निसर्गाच्या अनमोल ठेव्याबरोबरच विविध दुर्मिळ वन्यजीवांनी हाऊसफुल झाले आहेत. राज्यातून हद्दपार झालेले गिधाड आणि अन्य वन्यजीवांची रेलचेल असल्याने पर्यटनाबरोबर आता वन्यजीव अभ्यासकांना हे अभयारण्य पर्वणीच ठरणार आहे.  अकोले तालुक्यातील अभयारण्याची ओळख आता केवळ निसर्गाच्या अविष्कारापुरती उरली नाही. अकोल्यातील कळसूबाई हरिश्चंद्रगड ही अभयारण्य नष्टप्राय होत चाललेल्या वन्यजीव जीवांच्या अस्तित्वाने हाऊसफुल झाले आहेत राज्यात या अभयारण्याची ही वेगळी ओळख होत आहे. 
   गेल्या जुलै महिन्यात भंडारदरा परिसरात राज्यातून हद्दपार झालेले वाईल्ड स्वीपर म्हणजे गिधाड सापडले आहे. मांजरे व पट्टा किल्ला, कोतूळ जवळील चिंचखांड घाटात गिधाडांचे अस्तित्व आढळल्याने संपूर्ण राज्यात गिधाडांचे नष्ट झालेले अस्तित्व सिद्ध झाले आहे. 
    राज्यातील दुर्मिळ चित्रांग नायकूळ नावाचा बीन विषारी साप साधारण चार पाच फूट लांबीचा आढळतो. पाल, सरडे, कीटक हे खाद्य असलेला साप चक्क नऊ फूट लांबीचा आढळून आला. अकोलेचे सर्पमित्र धनंजय मोहिते यांनी हा साप नऊ फूटाचा चित्रांग नायकूळ आहे. अद्याप इतका लांब नायकूळ कधीच सापडला नसल्याचे मोहिते यांनी स्पष्ट केले. 
  मागील महिन्यात दुर्मिळ बॅन्डेड गेको ही पट्टेरी पाल हरिश्चंद्रगड परिसरात आढळली. पांजरे येथील बेटावर जून महिन्यात खापर खवल्या अर्थात खवले मांजर आढळले. ते खवले दगडासारखे टणक असतात.तो लाजाळू असून धोक्याच्या वेळी फुटबॉलप्रमाणे अंग गोळा करून दूर घरंगळत जातो. छोटे वाहन जरी अंगावरून गेले तरी त्यास इजा होत नाही. या अभयारण्यात  पक्षी, रानगवा, बिबट्या, वानरे, रानडूकरे अशा असंख्य प्राण्यांचे अस्तित्व आहे.
जुलै महिन्यात आजारी अवस्थेत दुर्मिळ गिधाड भंडारदरा परिसरात सापडले. संपूर्ण अभयारण्यात आणखी चार ते पाच गिधाड जोड्यांचे अस्तित्व जाणवते, असे कळसूबाई अभयारण्याचे वनपरिक्षेत्राधिकारी डी. डी. पडवळ यांनी सांगितले. 
हरिश्चंद्रगड अभयारण्यात खवले मांजर, बॅन्डेड गेको, चित्रांग नायकूळ या दुर्मिळ प्राण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.  वन्यजीवांच्या व अभ्यासकांसाठी आनंदाची बाब आहे, असे  वनपरिक्षेत्राधिकारी अमोल आडे यांनी सांगितले.
घाटघर परिसरात आढळलेला बिन विषारी चित्रा नायकूळ नऊ फूट लांब होता. तसेच अभयारण्यात अनेक दुर्मिळ पक्षी व प्राणी मोठ्या संख्येने आहेत, असे  वन्यजीव अभ्यासक डॉ. आकाश देशमुख यांनी सांगितले.         

Web Title: The existence of a vulture, Chitrang Naikul, Khawaly cat in Akole taluka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.