पुणे-नगर महामार्गावर निघोजकरांचा रास्तारोको
By Admin | Published: May 25, 2017 02:01 PM2017-05-25T14:01:58+5:302017-05-25T14:01:58+5:30
पुणे-नगर महामार्गावर गव्हाणवाडी येथे निघोज ग्रामस्थांनी ठिय्या दिला़ या रास्तारोकोमुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़
आॅनलाईन लोकमत
पारनेर, दि़ २५ - निघोजचे माजी सरपंच संदीप वराळ हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना अटक करावी, वराळ कुटुंबियांना संरक्षण द्यावे, या मागण्यांसाठी गुरुवारी सकाळी पुणे-नगर महामार्गावर गव्हाणवाडी येथे निघोज ग्रामस्थांनी ठिय्या दिला़ या रास्तारोकोमुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या़
संदीप वराळ हत्याकांडातील १५ आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे़ हे सर्व आरोपी सध्या कोठडीत आहेत़ मात्र, यातील इतर पाच आरोपींना अद्याप अटक झालेली नाही़ यात पुणे जिल्ह्यातील व स्थानिक आरोपींचा समावेश आहे़ त्यांना तात्काळ अटक करावी, वराळ कुटुंबियांना संरक्षण द्यावे, संदीप वराळ यांचे बंधू सचिन वराळ यांना स्वसंरक्षणासाठी रिव्हॉल्वर बाळगण्याचे लायसन्स मिळावे आदी मागण्या आंदोलकांनी केल्या़ या आंदोलनाचे नेतृत्व संदीप वराळ यांचे बंधू सचिन वराळ, संदीप वराळ यांच्या पत्नी व जिल्हा परिषद सदस्या पुष्पा वराळ, पंचायत समिती सदस्य दिनेश बाबर, पारनेरचे नगरसेवक नंदकुमार औटी यांनी केले़