रमजाननिमित्त विदेशी फळे बाजारात

By Admin | Published: June 29, 2016 12:47 AM2016-06-29T00:47:40+5:302016-06-29T00:56:39+5:30

अहमदनगर : रमजान सनानिमित्त बाजारपेठेत उलाढाल वाढली असून, फळांचा बाजारही चांगलाच फुलला आहे़ उपवास (रोजा) सोडण्यासाठी मुस्लीम

Exotic fruits market in Ramadan | रमजाननिमित्त विदेशी फळे बाजारात

रमजाननिमित्त विदेशी फळे बाजारात


अहमदनगर : रमजान सनानिमित्त बाजारपेठेत उलाढाल वाढली असून, फळांचा बाजारही चांगलाच फुलला आहे़ उपवास (रोजा) सोडण्यासाठी मुस्लीम बांधव मोठ्या प्रमाणात फळांची खरेदी करत असून, बाजारपेठेत दिवसभर गर्दी दिसत आहे़ गेल्या पंधरा दिवसांपासून परदेशी फळांची मोठी आवक वाढली असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले़
शहरातील औरंगाबादरोड, मनमाडरोड, कोठला, नवीपेठ, चितळेरोड, कापड बाजार, प्रोफेसर चौक, माळीवाडा, मार्केट यार्ड आदी ठिकाणी फळ विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत़ बाजारात सध्या टरबूज, खरबूज, चिकू, केळी, अननस, डाळिंब, सफरचंद, संत्री, मोसंबी या फळांना विशेष मागणी होत आहे़ काश्मीरमधील सरफरचंदासह इतर फळांचा सध्या सिझन संपल्याने परदेशातून फळांची आयात होत असून, दर २० ते २५ टक्यांनी वाढले आहेत़ आंबा, टरबूज, खरबूज, पपई, डाळिंब, मोसंबी ही फळे स्थानिक ठिकाणीच उपलब्ध असली तरी आवक कमी असल्याने त्यांचे दर वाढले आहेत़ टरबूज व खरबुजांची आवक घडटल्याने गुजरात, मध्यप्रदेश येथून आयात केले जात आहेत. राहुरी कृषी विद्यापीठातील आंबा सध्या शहरात विक्रीसाठी आणला जात आहे़ शहरात चौकाचौकांसह उपनगरातही फळविक्रेत्यांच्या हातगाड्या दिसत असून, सायंकाळी या ठिकाणी ग्राहकांची मोठी गर्दी होत आहे़ भाजीबाजारही सध्या तेजीत असून, कांदा वगळता इतर सर्व भाज्यांचे दर चांगलेच वाढले आहेत़
(प्रतिनिधी)

Web Title: Exotic fruits market in Ramadan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.