आदिवासी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा-वैभव पिचड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2019 05:52 PM2019-10-15T17:52:44+5:302019-10-15T17:53:16+5:30

आदिवासी आरक्षणाबाबत आमचे धोरण काल जे होते ते आजही आहे. राष्ट्रवादीमध्ये गेलेल्यांनी आदिवासी आरक्षणाबाबतची त्यांच्या पक्षाची भूमिका जाहीर करावी, असे आवाहन महायुतीचे उमेदवार वैभव पिचड यांनी विरोधकांना केले.

Explain the role of tribal reservation - glory pitched | आदिवासी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा-वैभव पिचड

आदिवासी आरक्षणाबाबत भूमिका स्पष्ट करा-वैभव पिचड

राजूर : आदिवासी आरक्षणाबाबत आमचे धोरण काल जे होते ते आजही आहे. राष्ट्रवादीमध्ये गेलेल्यांनी आदिवासी आरक्षणाबाबतची त्यांच्या पक्षाची भूमिका जाहीर करावी, असे आवाहन महायुतीचे उमेदवार वैभव पिचड यांनी विरोधकांना केले.
बाजारपेठ चौकात सभेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी आर. पी. आयचे नेते भाई पवार होते. यावेळी पिचड बोलत होते. माजीमंत्री मधुकरराव पिचड, भाजपा तालुकाध्यक्ष सीताराम भांगरे, गटनेते जालिंदर वाकचौरे, मधुकर नवले, सरपंच हेमलता पिचड, शिवाजी धुमाळ, माजी सभापती बाळासाहेब देशमुख, सेनेचे तालुकाध्यक्ष मच्छिंद्र धुमाळ, महेश नवले, गणपत देशमुख, गोकुळ कानकाटे, संतोष बनसोडे, विजय लहामगे, बाळासाहेब लहामगे, काशिनाथ साबळे, सुरेश भांगरे, आयुब तांबोळी उपस्थित होते.
वैभव पिचड म्हणाले, आदिवासी समाजाच्या हक्कासाठी वडिलांनी आयुष्यभर संघर्ष केला. घटनेने दिलेल्या आरक्षणाला त्यांनी धक्का लागू दिला नाही. आम्ही आदिवासींच्या आरक्षणाला धक्का लावणार नाही, असा शब्द मुख्यमंत्र्यांकडून घेतला आहे. चाळीस वर्षात काय केले म्हणणाºयांनी आपल्या भागात झालेले रस्ते, छोटी धरणे व इतर कामे कोणी केली? तालुक्यात झालेली धरणे, तालुक्यात झालेली पाटपाण्याची कामे पाहावी. ही सर्व कामे झाल्यामुळे कष्टकरी आज येथील बाजारपेठेत ताठ मानेने उभा आहे. महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी पूर्वेकडे वळवणे. प्रत्येक गोरगरीब माणसाला घर असावे यासाठी घरकुल योजना, शेवटच्या माणसांपर्यत विकास पोहचवण्यासाठी डी. बी. टी. योजना अशा विविध योजना राबविल्या. भास्कर एलमामे यांनी सूत्रसंचालन केले तर आरपीआयचे तालुकाध्यक्ष गौतम पवार यांनी आभार मानले.
यावेळी माजी मंत्री मधुकर पिचड म्हणाले, मी तुमच्यासाठी आयुष्य घातले. आता मी भारतीय जनता पार्टीत जाण्याच्या घेतलेल्या निर्णयाला तुम्ही साथ द्या.

Web Title: Explain the role of tribal reservation - glory pitched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.