फेलोशिप, शिष्यवृत्तीला मुदतवाढ द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:23 AM2021-02-09T04:23:18+5:302021-02-09T04:23:18+5:30
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठविले आहे. कोविड-१९ या ...
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक, पालकमंत्री हसन मुश्रीफ आणि जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांना ई-मेलद्वारे निवेदन पाठविले आहे. कोविड-१९ या साथीच्या रोगाने देशभरातील शाळा व महाविद्यालयांना डिजिटल प्लॅटफॉर्मवर वर्ग बदलण्यास भाग पाडले आहे. शिक्षण क्षेत्र आणि नोकरीबाबत केंद्र सरकारने यापुढे आता अधिक जागृत राहावे. कारण बरेच विद्यार्थी नोकरी मिळण्यासाठी धडपडत आहेत. विद्यार्थ्यांना फेलोशिप आणि शिष्यवृत्तीसाठी देण्यात येणाऱ्या निधीला पुढील आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणात यासाठी वाढ देण्यात यावी, अशी संघटनेने मागणी केली आहे.
स्किल इंडिया कार्यक्रमाची स्थापना झाल्यापासून ६५ लाख लोकांनी या योजनेअंतर्गत विविध क्षेत्रांत शिक्षण घेतले आहे; परंतु केवळ १५.५ लाख लोकांनाच प्लेसमेंट मिळाले आहे. अशाप्रकारे खर्च आणि कार्यक्षमता यांच्यातील तफावत अगोदर कमी केली जावी, अशीही मागणी रिजवान बागवान, फरहान बागवान, जिशान बागवान, अर्शान बागवान, अनिस बागवान, अनिस तांबोळी, सोहेल आतार, नवीद कुरेशी, अक्रम बेपारी, अब्बास कुरेशी, बच्चू खाटीक, फरीद तांबोळी, रईस कुरेशी, बाबा मुलाणी, अबरार कुरेशी, असलम बागवान, नवीद बागवान, रईस बागवान, मुश्रीफ बागवान, रेहान बागवान, मुजीम चौधरी, शब्बीर खाटिक, मुज्जू खाटिक, बादशाह बागवान, असिफ पिंजारी, इसाक रंगरेज, मुसा रंगरेज, आलम तांबोळी, बाबा अन्सारी, कय्युम नालबंद, फरीद पिंजारी, आरिफ आतार, शफी मणियार, आसिफ रंगरेज, आसिफ बागवान, मोहसीन तांबोळी, मुशताक आतार आदींनी केली आहे.