इमामपूरला नेत्र तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:26 AM2021-07-07T04:26:38+5:302021-07-07T04:26:38+5:30
केडगाव : मिशन राहतअंतर्गत स्नेहालय व इमामपूर (ता. नगर) ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात ...
केडगाव : मिशन राहतअंतर्गत स्नेहालय व इमामपूर (ता. नगर) ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवारी नेत्र तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाचा संसर्ग झालेल्या कुटुंबांना आधार देण्यासाठी स्नेहालय परिवाराचे मिशन राहत अभियान सुरू आहे. पहिल्या टप्प्यात १५ जून ते १५ ऑगस्ट या कालावधीत नगर तालुक्यातील प्रत्येक गावात कोरोना पीडित कुटुंबाला सावरण्याचे काम मिशन राहतअंतर्गत करण्यात येत आहे. मिशन राहतअंतर्गत कोविड केअर सेंटर, स्नेह सहयोग, नेत्र तपासणी, शिक्षण शिष्यवृत्ती योजना, अनाम प्रेम दिव्यांग सहयोग योजना असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. इमामपूर येथे नेत्र तपासणी शिबिराला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यावेळी स्नेहालयाचे विक्रम प्रभू, प्रियंका शेंडगे, ओमकार भागवत, राधिका रणभोर, पूजा शिरसाठ, रीता प्रभू, इमामपूरचे सरपंच भीमराज मोकाटे, ग्रामसेवक राहुल गांगर्डे, ग्रामपंचायत सदस्य बाजीराव आवारे, माजी सरपंच नवनाथ मोकाटे, गोवर्धन आवारे, अनिकेत आवारे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
050721\img-20210705-wa0256.jpg
इमामपुर फोटो