फेसबुकवर महिलेची बदनामी : आरोपीला अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2018 12:28 PM2018-06-13T12:28:03+5:302018-06-13T12:28:19+5:30
फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून महिलेची बदनामी करणाऱ्या तरूणाला सायबर पोलीसांनी मंगळवारी खरवंडी (ता़ पाथर्डी) येथून अटक केली आहे. गणेश नामदेव बांगर (वय २०) असे ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नाव आहे.
अहमदनगर: फेसबुकवर बनावट अकाऊंट तयार करून महिलेची बदनामी करणाऱ्या तरूणाला सायबर पोलीसांनी मंगळवारी खरवंडी (ता़ पाथर्डी) येथून अटक केली आहे. गणेश नामदेव बांगर (वय २०) असे ताब्यात घेतलेल्या तरूणाचे नाव आहे.
गणेश बांगर याने नगर येथील एका महिलेचे फेसबूकवर बनावट अकाऊंट तयार केले. या अकांउटवर त्याने सदर महिलेचा फोटोही अॅपलोड केला. या अकाऊंटच्या माध्यमातून बांगर याने महिलेचा पती ज्या कंपनीत काम करत आहेत तेथे नोकरी करणाºया महिलांना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविली. तसेच सदर महिलांचा व्हॉटसअॅप क्रमांक मिळवून त्यांच्याशी अश्लिल चॅट केले. ही बाब लक्षात अल्यानंतर सदर महिला व तिच्या पतीने येथील सायबर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या नावे फिर्याद दाखल केली. सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सुनील पवार व त्यांच्या पथकाने तांत्रिक तपास करून आरोपीचा शोध घेतला. तेव्हा खरवंडी येथील नामदेव बांगर याने अशा पद्धतीने बनावट आकाऊंट तयार केले असल्याचे समोर आले. पोलीसांनी खरवंडी येथे जाऊन बांगर याला ताब्यात घेतले आहे. पवार यांच्यासह सहाय्यक निरिक्षी प्रतिक कोळी, वाव्हळ, कॉस्टेबल राहुल गुंडू, प्रशांत राठोड, अरूण सांगळे, भगवान कोंडार, आकाश भैरट, नेहा तावरे, उर्मिला चेके यांच्या पथकाने ही कामगिरी केली.