राज्य सरकारचे अपयश केंद्राच्या माथी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:22 AM2021-05-18T04:22:03+5:302021-05-18T04:22:03+5:30
कोपरगाव येथे संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने सोमवारी (दि. १७) सुरू करण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते ...
कोपरगाव येथे संजीवनी उद्योग समूहाच्या वतीने सोमवारी (दि. १७) सुरू करण्यात आलेल्या डेडिकेटेड कोविड हेल्थ केअर सेंटरच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, माजी आ. स्नेहलता कोल्हे, जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे, भाजपचे नेते बाळासाहेब परागसंधान, शिर्डीचे नगराध्यक्ष शिवाजी गोंदकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर, सहकारमहर्षी कोल्हे कारखान्याचे उपाध्यक्ष अप्पासाहेब दवंगे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
फडणवीस म्हणाले, गेल्या वर्षी झालेल्या चक्रीवादळात राज्य सरकारने तुटपुंजी मदत जाहीर केली होती. ती मदतही अजून पोहोचली नाही. कोकणात वाड्याच्या वाड्या नष्ट झाल्या. यावेळी नुकसान कमी व्हावे, अशी अपेक्षा आहे. आपत्तीत राज्य सरकारने जनतेच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहायला हवे. राज्य सरकारच्या चुकीमुळे राज्यातील शेतकरी पंतप्रधान पीक विमा योजनेपासून वंचित राहिले आहेत. सुरुवातीला सरकारने टेंडर काढले नाही. उशिरा काढले तर काही जिल्ह्यात टेंडरच झाले नाही. फळबागांच्या संदर्भात अनेक निकष यांनी बदलले. निकष बदलल्याने टेंडर झाले तेथे मदत मिळाली नाही, त्यामुळे यासंदर्भात सरकारने गांभीर्याने विचार करायला हवा, असेही ते म्हणाले.
---------------------
हे राज्याचे मोठे नुकसान
खा. राजीव सातव यांचे जाणे वेदनादायी आहे. कोरोनाच्या काळात अनेक नेते सोडून गेले. खा. राजीव सातव यांच्या बरोबरच मी काम केले आहे. पक्षाच्या पलीकडे जाऊन सर्वांशी संबंध ठेवणारे ते चांगले नेते होेते. चांगले भविष्य असणारा नेता जेव्हा निघून जातो, तेव्हा हे राज्याचे मोठे नुकसान ठरते, अशी भावना फडणवीस यांनी खा. सातव यांच्या निधनाबद्दल व्यक्त केली.