राज्य सरकारचे अपयश जनतेपर्यंत पोहोचविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:20 AM2021-04-07T04:20:46+5:302021-04-07T04:20:46+5:30
अहमदनगर भाजप कार्यकारिणी ऑनलाइन बैठक पार पडली. दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयाेजित करण्यात आली हाेती. ...
अहमदनगर भाजप कार्यकारिणी ऑनलाइन बैठक पार पडली. दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयाेजित करण्यात आली हाेती. या बैठकीत पदाधिकाऱ्यांना विविध सूचना करण्यात आल्या.
यावेळी आगामी काळातील विविध उपक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. त्यामध्ये पक्षाचा ६ एप्रिल रोजी स्थापना दिन आहे. या दिवशी प्रत्येक बुथवर बैठक घेऊन पक्षाचा झेंडा लावणे, तसेच १४ एप्रिल रोजी घटनेचे शिल्पकार डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती प्रत्येक बुथवर साजरी करणे, बुथ प्रभारी, शक्ती केंद्रप्रमुख यांनी बूथवर जाऊन कमिटी तयार करावी.
मुंढे म्हणाले, कोरोना काळात सर्वसामान्यांना मदत करणे,
लसीकरणासंदर्भात जनजागृती करणे असे विविध कार्यक्रम आखण्यात आले असून, ते राबविण्यासंदर्भात जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. त्यामध्ये वीज जोड तोडणे, अवकाळी पावसामुळे झालेली नुकसान भरपाई न देणे, राज्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत झालेली वाढ, कोरोनाचा उद्रेक सुरू असताना, तो नियंत्रणात आणण्यात आलेले अपयश झाकण्यासाठी, राज्यातील आघाडी सरकार केंद्राकडे बोट दाखविण्याचे काम करत आहे.
केंद्र सरकारने आत्मनिर्भर भारत या योजनेखाली २० लाख कोटी रुपयांचे पॅकेज जाहीर करून उद्योग धंद्यांना दिलासा दिला आहे. गरिबांना मोफत धान्य, गॅस सिलिंडर, जनधन योजनेत पैसे अशा प्रकारच्या कामातून छोट्या घटकांना लाभ देण्याचे काम केले.