पोलीस भरतीसाठी बनावट प्रमाणपत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2018 02:38 PM2018-10-05T14:38:32+5:302018-10-05T14:38:36+5:30
प्रकल्पग्रस्त असल्याचा बनावट दाखला सादर करून पोलिसात नोकरी मिळवणाऱ्यासह चौघांविरूद्ध गुरूवारी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भूसंपादन विभागाने फिर्याद दिली आहे.
अहमदनगर : प्रकल्पग्रस्त असल्याचा बनावट दाखला सादर करून पोलिसात नोकरी मिळवणाऱ्यासह चौघांविरूद्ध गुरूवारी कोतवाली पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी भूसंपादन विभागाने फिर्याद दिली आहे.
नगर तालुक्यातील बारदरी येथील किरण सुरेश तोरडमल या तरूणाने भूसंपादनाचा बनावट दाखला करून प्रकल्पग्रस्त असल्याचे बनावट प्रमाणपत्र तयार केले. या प्रमाणपत्रासाठी त्याने भूसंपादन अधिकारी क्रं. ७च्या कार्यालयातील बनावट शिक्के, बनावट सही करून अगोदर दाखला मिळवला. त्याच्या आधारे नंतर प्रमाणपत्र तयार केले. या प्रमाणपत्राचा वापर त्याने ठाणे येथे झालेल्या पोलीस भरतीत केला. या प्रमाणपत्राच्या आधारे तो पोलिसांत भरतीही झाला. त्यानंतर जुलै महिन्यात पुनर्वसन विभागाकडून भूसंपादनाकडे असे प्रमाणपत्र दिले आहे का? याबाबत विचारणा केली गेली. त्यानंतर हे प्रकरण उजेडात आले.
दरम्यान, भूसंपादन अधिकारी क्रमांक ७च्या मंडलाधिकारी राधाबाई ससाणे यांच्या फिर्यादीवरून गुरूवारी कोतवाली पोलिसांनी किरण सुरेश तोरडमल, त्याचे वडील सुरेश विठोबा तोरडमल, नातेवाईक मधुकर भास्कर तोरडमल, अमोल मधुकर तोरडमल (सर्व रा. बारदरी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.