‘महानगर’च्या संगमनेर शाखेत खोटे सोने ठेवले तारण; बँकेला गंडवले
By शेखर पानसरे | Published: March 26, 2023 04:42 PM2023-03-26T16:42:34+5:302023-03-26T16:42:45+5:30
शहरात विद्यानगर परिसरात बँकेची शाखा आहे. गुन्हा दाखल झालेले शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेत.
संगमनेर : जी. एस. महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संगमनेर शाखेत खोटे सोने तारण ठेवणाऱ्या २३ जणांविरुद्ध संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात महिलांचा देखील समावेश आहे. बँकेचा गोल्ड व्हॅल्युअर आणि खोटे सोने तारण ठेवून कर्ज घेणाऱ्यांनी बँकेची ८२ लाख ५७ हजार ८३४ रूपयांची फसवणूक केली आहे.
जगदीश लक्ष्मण शहाणे (गोल्ड व्हॅल्युअर रा. एकता चौक, मालदाड रस्ता, संगमनेर) याच्यासह खोटे सोने तारण ठेवणाऱ्या २२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. जी. एस. महानगर को-ऑपरेटिव्ह बँकेच्या संगमनेर शाखेचे व्यवस्थापक प्रदीप एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला. शहरात विद्यानगर परिसरात बँकेची शाखा आहे. गुन्हा दाखल झालेले शहर आणि तालुक्याच्या ग्रामीण भागातील आहेत.