बाजारात आवक वाढल्याने आंब्याच्या भावात घसरण
By Admin | Published: April 28, 2016 10:56 PM2016-04-28T22:56:56+5:302016-04-28T23:17:01+5:30
अहमदनगर : आंब्याची आवक वाढल्यामुळे भावात घसरण झाली आहे. अक्षय तृतीयेपर्यंत आंब्यांचे भाव आणखी घसरतील अशी शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली
अहमदनगर : आंब्याची आवक वाढल्यामुळे भावात घसरण झाली आहे. अक्षय तृतीयेपर्यंत आंब्यांचे भाव आणखी घसरतील अशी शक्यता विक्रेत्यांनी वर्तविली. शिवाय गावरान आंबाही आता बाजारात आला आहे.
गत आठवड्यात आंब्याचे दर तीनशे रुपयांच्या पुढे होते. त्यामुळे सामान्यांना आंबा कडू झाला होता. आंब्याची आवक वाढल्यामुळे दुकानांची संख्याही वाढली.
आंबा रस हा लग्नातील एक मेन्यू होता. मात्र यंदा लग्नाच्या मेनूतूनही तो गायब झाला. त्यामुळे आंब्याची मागणी घटली. दुसरीकडे आवक वाढली. त्यामुळे आंब्याचे भाव घसरले आहेत. आंब्यांची आवक दिवसेंदिवस वाढत असून अक्षय तृतीयापर्यंत ते आणखी कमी होतील असे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले.
(प्रतिनिधी)
आंब्याची आवक व दुकानांची संख्या वाढली. लग्नाच्या मेन्यूतूनही आंबा रस गायब झाला आहे. मागणी घटली. अक्षय तृतीयापर्यंत आंब्याचे दर आणखी घटतील. - पप्पू आहुजा