बनावट कागदपत्र देऊन फायनान्स कंपनीला गंडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2019 15:47 IST2019-07-31T15:46:28+5:302019-07-31T15:47:36+5:30
वाहन खरेदीसाठी वित पुरवठा करणाऱ्या येथील चोलामंडल इन्वेस्टमेंट फायनान्स कंपनीला ट्रॅक्टरचे बनावट कागदपत्रे सादर करून ६ लाख १२ हजार रुपयांना गंडा घातला़

बनावट कागदपत्र देऊन फायनान्स कंपनीला गंडा
अहमदनगर : वाहन खरेदीसाठी वित पुरवठा करणाऱ्या येथील चोलामंडल इन्वेस्टमेंट फायनान्स कंपनीला ट्रॅक्टरचे बनावट कागदपत्रे सादर करून ६ लाख १२ हजार रुपयांना गंडा घातला़ याबाबत कंपनीच्यावतीने सचिन सूर्यकांत दहातोंडे यांनी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे़
पोलिसांनी रामदास आबाजी बनसोडे, सुरज रामदास बनसोडे व योगेश भाऊसाहेब आढाव (रा़ तिघे मातावली ता़ आष्टी जि़ बीड) यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे़ रामदास व सुरज बनसोडे याने मार्च २०१६ मध्ये ट्रॅक्टरवर ४ लाखांचे लोण घेण्यासाठी कंपनीकडे अर्ज केला़ यासाठी योगेश आढाव जामिनदार झाला़ कंपनीने बनसोडे याला कर्ज दिले़ त्याला ४८ महिन्यांत या कर्जाची परतफेड करायची होती़ कर्जदाराने मात्र एकही हप्ता भरला नाही. कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी कर्जदाराच्या पत्यावर भेट दिली तेव्हा अशा नावाचे तेथेही कोणीही राहत नसल्याचे समोर आले तसेच कर्ज घेण्यासाठी सादर केलेले सर्व कागदपत्र बनावट असल्याचे समोर आले़
याबाबत कंंपनीने येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात फिर्याद दाखल केली होती़ न्यायालयाच्या आदेशानुसार पोलीस ठाण्यात फसवणूक करणाºयांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़