प्रवास करून आलेली कुटुंब होताहेत पॉझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 22, 2021 04:19 AM2021-03-22T04:19:28+5:302021-03-22T04:19:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क अहमदनगर : बाहेरगावी प्रवास करून आलेली कुटुंबच्या कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याचे महापालिकेच्या चाचणीतून समोर आले ...

Families who have traveled are becoming positive | प्रवास करून आलेली कुटुंब होताहेत पॉझिटिव्ह

प्रवास करून आलेली कुटुंब होताहेत पॉझिटिव्ह

लोकमत न्यूज नेटवर्क

अहमदनगर : बाहेरगावी प्रवास करून आलेली कुटुंबच्या कुटुंब कोरोना पॉझिटिव्ह येत असल्याचे महापालिकेच्या चाचणीतून समोर आले आहे. त्यामुळे शहरातील कोरोना रुग्णांचा आकडा वाढत असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

शहर व परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यासाठी महापालिकेने चाचण्यांची मोहीम हाती घेतली आहे. या चाचणीमध्ये जे कुटुंब बाहेरगावाहून प्रवास करून शहरात आले, ते कोरोनाचे बळी ठरत आहेत. त्यामुळे शक्यताे नागरिकांनी प्रवास टाळणे आवश्यक आहे. गरज असेल तरच घराबाहेर पडावे, असे आवाहन महापालिकेेकडून करण्यात आले आहे.

ज्या भागात पाचपेक्षा जास्त रुग्ण आढळून आले आहेत, त्या भागात महापालिकेने कंटेन्मेंट झोन जाहीर केले आहेत. घरातील ५ ते ६ जण पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढलेले आहे. यापूर्वी एकाच घरातील सर्व व्यक्ती पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण कमी होते. परंतु, अलिकडे संपूर्ण कुटुंब कोरोनाचे बळी ठरत असून, या काळात प्रवास करताना काळजी घेणे गरजेचे आहे.

महापालिकेने शहरात १९ ठिकाणे बंद केली आहेत. कंटेन्मेंट करताना एक किंवा दोन घरे, एवढा भाग बंद करण्यात येतो. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. महापालिकेने नियम न पाळणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी चार भरारी पथके स्थापन केली आहेत. या पथकाने रविवारी २७ जणांवर कारवाई केली आहे. सर्व खासगी कार्यालयांत ५० टक्के कर्मचारी उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे. कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी मनपाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. परंतु, शहरात बाहेर जाणाऱ्यांचे आणि बाहेरून शहरात येणाऱ्यांचे प्रमाण मोठे आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

....

भरारी पथकाचे प्रमुख पॉझिटिव्ह

सोशल डिस्टन्सिंग, मास्क आदी नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महापालिकेने चार पथके स्थापन केली आहेत. दोन पथकांच्या प्रमुखांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे पालिका कर्मचाऱ्यांमध्येही भीतीचे वातावरण आहे.

....

- प्रवास करून आलेले कुटुंब कोरोनाचे बळी ठरत असल्याचे प्रकर्षाने जाणवत आहे. त्यामुळे नागरिकांनी शक्यतो बाहेरगावचा प्रवास टाळावा. तसेच सामाजिक अंतर, मास्क् आणि सॅनिटायझरचा वापर करावा.

- शंकर गोरे, आयुक्त

Web Title: Families who have traveled are becoming positive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.