ब्राह्मणीत सारीच्या पार्श्वभूमीवर कुटुंब निहाय सर्व्हे सुरू,पाच दिवसात तपासणी करून अहवाल तयार करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2020 06:19 PM2020-04-16T18:19:05+5:302020-04-16T18:19:16+5:30
ब्राह्मणी- सारीच्या पार्श्वभूमीवर कुटुंब निहाय सर्व्हे सुरू ब्राह्मणी- कोरोना पाठोपाठ धुमाकूळ घालणाऱ्या सारी रोगाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून ब्राह्मणीत दोन दिवसांपासून कुटुंबनिहाय सर्व्हे सुरू आहे. अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांना प्रभागनिहाय सर्व्हेसाठी कुटूंबाची जबाबादरी देण्यात आली आहे.
ब्राह्मणीत सारीच्या पार्श्वभूमीवर कुटुंब निहाय सर्व्हे सुरू,पाच दिवसात तपासणी करून अहवाल तयार करणार
ब्राह्मणी- सारीच्या पार्श्वभूमीवर कुटुंब निहाय सर्व्हे सुरू ब्राह्मणी- कोरोना पाठोपाठ धुमाकूळ घालणाऱ्या सारी रोगाच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय योजना म्हणून ब्राह्मणीत दोन दिवसांपासून कुटुंबनिहाय सर्व्हे सुरू आहे. अंगणवाडी सेविका व आशा सेविका यांना प्रभागनिहाय सर्व्हेसाठी कुटूंबाची जबाबादरी देण्यात आली आहे.
राहुरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी गोविद खामकर यांच्या आदेशानुसार पाच दिवसात सर्व्हे पूर्ण करून संपूर्ण अहवाल तयार करण्यात येणार आहे. कुटूंबातील सदस्यांची माहिती घेवून ताप, सर्दी,खोकला व श्वसनाचा त्रास याबाबत माहिती घेतली जात आहे.बुधवार पासून कुटुंब निहाय सर्व्हे सुरू करण्यात आला असून यामध्ये ८८८ कुटूंबातील एकूण ४ हजार ३६७ नागरिकांची तपासणी करण्यात आली.१७ जेष्ठ व्यक्तींमध्ये सर्दी, ताप, खोकला आदी लक्षणे दिसून आली. सबधितांवर खाजगी व उपकेंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून उपचार सुरू आहे. कोरोनाच्या धर्तीवर सारीपासून बचावासाठी ब्राह्मणीत सदर सर्व्हे करण्यात येत असल्याची माहिती आरोग्य सेविका सविता चव्हाण यांनी दिली.सरपंच प्रकाश बानकर,ग्रामविकास अधिकारी माणिक घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली आशा सेविका व अंगणवाडी सेविका सध्या युद्धपातळीवर कुटुंब निहाय सर्व्हे करत आहे. ब्राह्मणीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज अखेर बाहेरून आलेल्या २६० व्यक्तींना होम क्वारंनटाईन करण्यात आले.दिवसागणिक ब्राह्मणीत येणाऱ्या बाहेरील व्यक्ती गावात येवून वास्तव्य करत आहे.त्यामुळे ब्राह्मणी गावासाठी चिंतेची बाब ठरत आहे.कोरोना विरोधातील युद्धात सुरवातीपासून योग्य नियोजन केल्यामुळे अन्य गावांच्या तुलनेत लॉकडाऊन यशस्वी होत आहे.गावातील अवैध व्यवसाय थांबविण्यात कोरोना दक्षता समितीस यश आले आहे.आता आगामी काही दिवस ग्रामस्थांनी स्वयंशिस्त पाळून सहकार्य करावे असे आहवान ग्रामपंचायत प्रशासन व कोरोना दक्षता समितीकडून करण्यात येत आहे..