दुष्काळात शेतक-याच्या हाकेला धावणारे लोकसेवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2019 12:23 PM2019-07-14T12:23:48+5:302019-07-14T12:23:56+5:30

तालुक्यातील भीषण दुष्काळामुळे त्रस्त झालेली जनता, पशुधन वाचवण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून प्रशासकीय पदावरून नियोजन

 In the famine of the farmers, the people of the village | दुष्काळात शेतक-याच्या हाकेला धावणारे लोकसेवक

दुष्काळात शेतक-याच्या हाकेला धावणारे लोकसेवक

हरिहर गर्जे
पाथर्डी : तालुक्यातील भीषण दुष्काळामुळे त्रस्त झालेली जनता, पशुधन वाचवण्यासाठी गेल्या सहा महिन्यापासून प्रशासकीय पदावरून नियोजन व व्यवस्थापनासाठी २४ तास तत्पर असलेले तहसीलदार नामदेव पाटील यांनी आपत्कालीन परिस्थितीत व्यवस्थापनाचा नवा आदर्श उभा केला आहे.
शेतकरी कुटुंबात जन्मलेले तहसीलदार नामदेव रामचंद्र पाटील यांचे मूळ गाव जळगाव जिल्ह्यातील अमळनेर तालुक्यातील पडालसे. पाथर्डी तहसीलचा कारभार सांभाळल्यापासून तहसीलमध्ये येणाºया प्रत्येक तक्रारदाराचे थेट म्हणणे ऐकून तात्काळ तोडगा काढण्याचा पायंडा पाटलांनी पाडला. गेल्या दुष्काळात शेतकऱ्यांना खरीपाचे ४२ कोटीचे अनुदान विनातक्रार वाटप केले. तसेच तांत्रिक अडचणीत अडकलेल्या व ऊसतोडणीसाठी स्थलांतरित झालेल्या अनुदानपात्र शेतकºयांसाठी अतिरिक्त १४ कोटींची मागणी शासनाकडे करून काही अनुदान वाटपाला सुरवात केली आहे.
तालुका माझे कुटुंब आहे, असे समजून विविध संकटे, नैसर्गिक आपत्ती ही लढण्याची संधी देत असतात, असा विश्वास बाळगून गत दुष्काळात शेतकºयांसाठी थेट उपाययोजना व व्यवस्थापणावर भर दिला. तालुक्यात १०८ छावण्यांमध्ये ६९ हजार जनावरे तसेच १०३ गावासाठी अमरापूर येथून २४ टॅँकर, राक्षी येथून ९१ टॅँकर, पांढरीपूल येथे ४२ असे एकूण १५७ टॅँकरच्या माध्यमातून ३९१ खेपांचा ताळमेळ घालून पारदर्शी नियोजन केले. तालुक्यातील विद्युत पुरवठा, भारनियमन, महामार्ग अपघात, दहावी-बारावी कॉपी थांबवण्यासाठी, शिव रस्ते खुले करण्यासाठी शिवार भेटी घेवून सामोपचाराने जागेवरच वाद मिटवण्यास प्राधान्य देताना जनसामान्याच्या मनात पाटलांनी आपुलकी निर्माण केली.
व्यवस्थापनात गडबड झाली तर तात्काळ उपाययोजना करून येणारे मोर्चे, आंदोलकांना शांततेने तोडगा काढून हसतमुखाने माघारी पाठवले जात असल्याने प्रशासनाला काम करण्यासाठी अधिक वेळ मिळत आहे.
तालुक्यातील शासनाच्या सर्व कार्यालयाशी व्यवस्थित ताळमेळ घालून कामकाज करत तलाठी, पशुधन अधिकारी यांच्याकडून दैनदिन अहवाल मागवून जनावरांच्या छावण्यांचेही त्यांनी योग्य नियोजन केले आहे.

परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी प्रबोधन
दहावी बारावीच्या परीक्षेतील कॉपी रोखण्यासाठी भरारी पथकासह विद्यार्थी व पालकांच्या प्रबोधनाचा नवीन प्रयोग तहसीलदारांनी तालुक्यात सुरू केला. त्यामुळे अभ्यासू विद्यार्थ्यांचे मनोधैर्य वाढले. जनावरांच्या छावणीमधील तक्रार प्राप्त होताच तात्काळ कार्यवाही केली. ताळमेळ घालण्यासाठी सोशल मीडियाचा योग्य वापर केला. पाणी चोरी रोखण्यासाठी उद्भव ते वितरणाचे ठिकाण येथे तपासणी करण्यासाठी प्रतिनिधी नेमले. फुंदेटाकळी येथील पाणी चोरीबाबत तात्काळ गुन्हा नोंदवला.

Web Title:  In the famine of the farmers, the people of the village

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.