अंबिका विद्यालयात वाबळे यांना निरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:15 AM2021-03-29T04:15:14+5:302021-03-29T04:15:14+5:30
अहमदनगर : केडगाव येथील श्री अंबिका माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालयातील उपशिक्षक सुनील वाबळे हे ३३ वर्षांच्या प्रदीर्घ ...
अहमदनगर : केडगाव येथील श्री अंबिका माध्यमिक व उच्च माध्यमिक विज्ञान विद्यालयातील उपशिक्षक सुनील वाबळे हे ३३ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर निवृत्त झाले. याबद्दल त्यांचा सपत्नीक पोशाख, साडी, पुष्पगुच्छ व श्रीफळ देऊन विद्यालयाच्या वतीने मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
गुरुकुल प्रमुख के. के. आठरे यांनी वाबळे यांचा परिचय करून दिला. सत्कारमूर्ती वाबळे यांनी आपल्या कार्यकाळातील अनुभव कथन केले. उपस्थितांच्या वतीने वाबळे यांचे जावई आशिष सांडभोर, मुलगा सचिन वाबळे, मुलगी सुप्रिया सांडभोर, सून सहाय्यक पोलीस निरीक्षक तेजस्विनी वाबळे, पुतण्या प्रवीण वाबळे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी कार्यक्रमास उपस्थित असलेले प्रमुख पाहुणे नागवडे कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन जिजाबापू शिंदे यांनी वाबळे यांच्या कार्यावर प्रकाशझोत टाकला. रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव शिवाजीराव भोर यावेळी म्हणाले, रयत शिक्षण संस्थेने महाराष्ट्रातील माणूस घडविण्याचा व त्याला नवा आकार देण्याचा निवृत्त सेवकांचा वाटा मोठा आहे. साधी माणसं ही संस्था प्रेमी संस्थेवर श्रद्धा ठेवणारे असतात. त्यांनीच रयत शिक्षण संस्थेला चांगल्या उंचीवर नेले आहे. या कार्यक्रमात सल्लागार समितीचे अध्यक्ष प्रभाकरराव गुंड, रावसाहेब सातपुते, विद्यालयाचे प्राचार्य तथा रयत शिक्षण संस्थेचे उत्तर विभागीय अधिकारी टी. पी. कन्हेरकर, सर्व शिक्षक - शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पी. आर. दामगुडे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार बी. एन. जगदाळे यांनी मानले.
----
फोटो- २८ वाबळे सर
केडगाव येथील अंबिका विद्यालयातील शिक्षक सुनील वाबळे यांना निवृत्ती निमित्त शाळेतर्फे निरोप देण्यात आला. यावेळी संस्थेचे माजी पदाधिकारी व शिक्षक.