येवती येथे शेतीशाळा
By | Published: December 5, 2020 04:33 AM2020-12-05T04:33:23+5:302020-12-05T04:33:23+5:30
ढवळगाव : येवती (ता. श्रीगोदा) येथे डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय अन्न सुरक्षा ...
ढवळगाव : येवती (ता. श्रीगोदा) येथे डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या जयंतीनिमित्त शेतीशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत पौष्टिक तृणधान्य रबी ज्वारी प्रकल्प येवती गावात सिद्धेश्वर कृषी उत्पादन गटामार्फत राबविण्यात येत आहे. तालुका कृषी अधिकारी पद्मनाभ म्हस्के यांनी एकात्मिक कीड व अन्नद्रव्य व्यवस्थान विषयावर मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी आबासाहेब भोरे यांनी ज्वारी पीक पेरणी ते काढणी व काढणीपश्चात प्रक्रियाविषयी मार्गदर्शन केले. यावेळी कृषी गटाचे अध्यक्ष बाजीराव ठोंबरे, सचिव राजेंद्र कापरे, गणेश शिंदे, कृषी सहायक प्रतीक कांबळे, मेजर ताम्हाणे उपस्थित होते.
फोटो : ०२ ढवळगाव
येवती येथील शेतीशाळेत सहभागी अधिकारी, शेतकरी.