कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:53 AM2021-01-13T04:53:16+5:302021-01-13T04:53:16+5:30
मांडवगण : मांडवगण (ता. श्रीगोंदा) येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा, नापिकीला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. निवृत्ती चंद्रभान बोरुडे ...
मांडवगण : मांडवगण (ता. श्रीगोंदा) येथील अल्पभूधारक शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा, नापिकीला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. निवृत्ती चंद्रभान बोरुडे (वय ४८, रा. मांडवगण, ता. श्रीगोंदा) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.
निवृत्ती बोरुडे यांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची असून त्यांना चार एकर कोरडवाहू शेती आहे. त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावर होती. ते भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते. सततची नापिकी, मुलाचे शिक्षण, मुलीच्या लग्नाचा खर्च याबाबत ते सतत चिंतेत असायचे. त्यातून ते कर्जबाजारी झाले होते. त्यामुळे ते प्रचंड तणावाखाली होते. यातून त्यांनी ४ जानेवारीला शेतात जाऊन विष प्राशन केले. नगर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना ९ जानेवारीस त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.