कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 9, 2021 04:24 AM2021-02-09T04:24:09+5:302021-02-09T04:24:09+5:30
शेवगाव : तालुक्यातील एरंडगाव भागवत येथील एका शेतकऱ्यानेे कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली. पांडुरंग हरिचंद्र ...
शेवगाव : तालुक्यातील एरंडगाव भागवत येथील एका शेतकऱ्यानेे कर्जबाजारीपणाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली.
पांडुरंग हरिचंद्र भागवत (वय ४८) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. राहत्या घरी रविवार ( दि.७) सकाळी नऊच्या सुमारास त्यांनी विष घेतले. ही बाब लक्षात येताच कुटुंबीयांनी त्यांना उपचारासाठी शेवगाव येथील नित्यसेवा हॉस्पिटलमध्ये नेले. तेथे उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. शेती, ठिंबक, घर व मुलीच्या लग्नासाठी त्यांनी कर्ज घेतले होते. ते परत फेड करू न शकल्यामुळे अडचणीत सापडले होते. त्यामुळे त्यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली, असे पोलिसांनी सांगितले. शेवगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली. पांडुरंग भागवत यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे.
फोटो : ०८ पांडुरंग भागवत