कर्जबाजारीपणामुळे श्रीरामपूर तालुक्यात शेतक-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 10:55 AM2020-06-27T10:55:04+5:302020-06-27T10:55:56+5:30

श्रीरामपूर तालुक्यातील खानापूर येथे एका शेतक-याने विष प्राशन करुन कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  

Farmer commits suicide in Shrirampur taluka due to debt bondage | कर्जबाजारीपणामुळे श्रीरामपूर तालुक्यात शेतक-याची आत्महत्या

कर्जबाजारीपणामुळे श्रीरामपूर तालुक्यात शेतक-याची आत्महत्या

श्रीरामपूर :  तालुक्यातील खानापूर येथे एका शेतक-याने विष प्राशन करुन कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.  अशोक तात्याबा आदिक (वय ४६) असे आत्महत्या केलेल्या शेतक-याचे नाव आहे. 

२२ जून रोजी डाळिंबाच्या बागेत अशोक आदिक याने विषप्राशन केले होते. त्यानंतर शहरातील साखर कामगार रुग्णालयात उपचार सुरू होते. शुक्रवारी पहाटे शेतक-याची प्राणज्योत मावळली. 

याप्रकरणी तालुका पोलिसांनी आकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. पोलीस शेतक-याच्या कर्जासंबंधी माहिती घेत आहेत. त्यांच्या पश्चात आई, मुलगा,  सुन, नातवंडे, दोन अविवाहित मुली असा परिवार आहे.

Web Title: Farmer commits suicide in Shrirampur taluka due to debt bondage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.