खांडवीत वीज पडून शेतक-याचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 01:18 PM2018-10-03T13:18:38+5:302018-10-03T13:19:30+5:30
कर्जत तालुक्यातील खांडवी येथे मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास जनावरे चारणाऱ्या एका शेतकºयाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला.
मिरजगाव : कर्जत तालुक्यातील खांडवी येथे मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास जनावरे चारणाऱ्या एका शेतकºयाचा अंगावर वीज पडून मृत्यू झाला. मिरजगाव परिसरात विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. काही ठिकाणी गाराही पडल्याचे ग्रामस्थांनी सांगितले.
पोपट देविदास तापकीर (वय ४०, खांडवी, ता. कर्जत) असे मृत्यू झालेल्या शेतकºयाचे नाव आहे. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. यंदा मिरजगाव परिसरात अत्यल्प पाऊस पडला आहे. मागील काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. दररोज काळेभोर ढगही येतात. मात्र पाऊस काही होत नव्हता. ढगांसह जोरदार वारेही सुटतात. विजाही कडाडतात. मंगळवारी दुपारपासूनच विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाटही सुरू होता. त्यावेळी काही ठिकाणी विजाही कोसळल्या. खांडवी येथील शेतकरी पोपट देविदास तापकीर हे जनावरे चारण्यासाठी शेतात गेले होते. दुपारी चारच्या सुमारास अचानक विजांचा कडकडाट सुरू झाला. जोरदार वारा सुटून पाऊसही सुरू झाला. यावेळी एक वीज तापकीर यांच्या अंगावर पडली. त्यात त्यांचा मृत्यू झाला.