शेतकरी वाटणार सरकारी कार्यालयात फुकट दूध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2018 04:41 PM2018-04-26T16:41:26+5:302018-04-26T16:47:12+5:30
अतिरिक्त दूध गोठ्यात नव्हे तर दूध संघात तयार होते. सरकारचे धोरण त्यास कारणीभूत आहे. या अतिरिक्त दुधाचा दरावर परिणाम होतो. सरकारला लुटता कशाला आता फुकट असा इशारा देत मे महिन्यात सात दिवस महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयांमध्ये शेतकरी संघर्ष समितीच्या पुढाकारातून शेतकरी दुधाचे फुकट वाटप करणार असल्याचे समन्वयक अजित नवले यांनी घोषणा केली. पत्रकार परिषदेत नवले बोलत होते.
अहमदनगर : अतिरिक्त दूध गोठ्यात नव्हे तर दूध संघात तयार होते. सरकारचे धोरण त्यास कारणीभूत आहे. या अतिरिक्त दुधाचा दरावर परिणाम होतो. सरकारला लुटता कशाला आता फुकट असा इशारा देत मे महिन्यात सात दिवस महाराष्ट्रातील सरकारी कार्यालयांमध्ये शेतकरी संघर्ष समितीच्या पुढाकारातून शेतकरी दुधाचे फुकट वाटप करणार असल्याचे समन्वयक अजित नवले यांनी घोषणा केली. पत्रकार परिषदेत नवले बोलत होते.
नवले म्हणाले, दूध संघात तयार होणा-या अतिरिक्त दुधामुळे दरावर परिणाम होतो. परिणामी शेतक-यांचा दुधधंदा अडचणीत आला आहे. कमी दरामुळे सरकारचा निषेध करण्यासाठी सरकारी कार्यालयात दूध वाटण्यात येणार आहे. येत्या ३ ते ९ मे या काळात गाव, तहसील, जिल्हाधिकारी कार्यालयात दुधाचे वाटप केले जाणार असल्याचे संघर्ष समितीचे अजित नवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. १ मे रोजी होणा-या ग्रामसभेत फुकट दूध वाटपचा ठराव केला जाणार असून ३ मे पासून आंदोलन सुरु होईल, असे ते म्हणाले.