कडबनवाडी येथील शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:17 AM2020-12-23T04:17:51+5:302020-12-23T04:17:51+5:30
जामखेड (जि. अहमदनगर) : तालुक्यातील साकत ग्रामपंचायत हद्दीतील कडबनवाडी येथील कैलास रामचंद्र नेमाने (वय ४२) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून ...
जामखेड (जि. अहमदनगर) : तालुक्यातील साकत ग्रामपंचायत हद्दीतील कडबनवाडी येथील कैलास रामचंद्र नेमाने (वय ४२) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली.
कडभनवाडी (साकत) येथील कैलास नेमाने यांच्याकडे दोन एकर जमीन होती. पंधरा दिवसांपूर्वी अर्धा एकर जमीन विकली होती. तरीही कर्ज फिटले नव्हते. काही कर्ज बँकेचे तर काही खाजगी सावकाराचे होते, अशी माहिती नातेवाइकांनी दिली. पंधरा दिवसांपूर्वी अर्धा एकर जमीन विकूनही कर्ज डोक्यावर होते. यामुळे गेल्या दहा दिवसांपासून ते मोठ्या मानसिक तणावाखाली होते. यातच सकाळी अकराच्या सुमारास वाडीच्या जवळ असणाऱ्या लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली व आपली जीवनयात्रा संपवली. घटनेची खबर पोलीस पाटील महादेव वराट यांनी जामखेड पोलिसांना दिली. पोलिसांनी ताबडतोब घटनास्थळी येऊन पंचनामा केला व मृतदेह शवविच्छेदनासाठी जामखेड ग्रामीण रुग्णालयात आणला. वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय वाघ यांनी शवविच्छेदन केले व मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. नेमाने यांच्या पश्चात दोन मुले, विवाहित मुलगी, आई, वडील असा परिवार आहे.
२२ कैलास नेमाने