शेतकरी कर्जमाफी : तक्रार निवारणासाठी तालुकास्तरीय समिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2019 03:26 PM2019-08-02T15:26:59+5:302019-08-02T15:28:10+5:30

अहमदनगर : सततच्या दुष्काळ व नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. काहींना याचा लाभ ...

Farmer loan : Taluka Committee for redressal of grievances | शेतकरी कर्जमाफी : तक्रार निवारणासाठी तालुकास्तरीय समिती

शेतकरी कर्जमाफी : तक्रार निवारणासाठी तालुकास्तरीय समिती

अहमदनगर : सततच्या दुष्काळ व नापिकीमुळे कर्जबाजारी झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने शेतकरी कर्जमाफी जाहीर केली. काहींना याचा लाभ मिळाला, तर अनेकांनी योजनेत बसत नसल्याच्या तक्रारी केल्या. तसेच चुकीच्या माहितीमुळे अनेकजण या योजनेपासून वंचित राहिले. त्यामुळे या योजनेविषयी असलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुकास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. ही समिती शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करेल.
राज्यात शासनाने २००९-१०पासून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना जाहीर केली. वेळोवेळी शासनाने या योजनेची व्याप्ती वाढवली. तसेच ग्रीन लिस्ट निर्गमित करून त्या आधारे पात्र लाभार्थ्यांची यादी जाहीर केली. तथापि बºयाच कर्ज खात्यांवर अपुरी माहिती, चुकीची माहिती, चुकीचे प्लॅनिंग या कारणांमुळे प्रक्रिया करणे शक्य झाले नाही. तसेच योजनेचा लाभ अद्याप मिळाला नसल्याबाबत अनेक तक्रारी शासनाकडे प्राप्त झाल्या.
तसेच योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकºयांना बँकाकडून नव्याने कर्जपुरवठा केला जात नाही, अशाही तक्रारी आल्या होत्या. त्या अनुषंगाने या तक्रारींचे निवारण करण्यासाठी तालुकास्तरीय समिती गठीत करण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला.
त्यानुसार जिल्हा उपनिबंधकांनी तालुकानिहाय समिती गठीत केली आहे. ही समिती दर आठवड्याला सोमवार व गुरूवार या दिवशी बैठक घेऊन तक्रारींचे निवारण करेल. शेतकºयांनी आवश्यक त्या कागदपत्रांसह समितीकडे अर्ज करावेत व नियोजित वेळी बैठकीस हजर राहावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी केले आहे.

अशी असेल समिती
समितीत संबंधित तालुक्याचे सहायक निबंधक हे समितीचे अध्यक्ष, तर सदस्य म्हणून जिल्हा सहकारी बँकेचा तालुक्यातील प्रतिनिधी, अग्रणी बँकेचा तालुका प्रतिनिधी, लेखापरीक्षक, तसेच सदस्य सचिव म्हणून सहकार अधिकारी असणार आहेत.

Web Title: Farmer loan : Taluka Committee for redressal of grievances

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.