शेतकरी शास्त्रज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2018 04:10 PM2018-11-04T16:10:10+5:302018-11-04T16:10:16+5:30
सडे (ता़राहुरी) या खेडेगावात जन्मलेले बी़ के. धोंडे हे नाव जुन्या पिढीतील शेतकऱ्यांना परिचित आहे़
सडे (ता़राहुरी) या खेडेगावात जन्मलेले बी़ के. धोंडे हे नाव जुन्या पिढीतील शेतकऱ्यांना परिचित आहे़ धोंडे सर म्हटले की सारा यंत्र आणि कंटूर मार्कर यांचे पेटंट असलेला कृषी शास्त्रज्ञ डोळ्यासमोर उभा राहतो़ पुण्यात दहा बाय दहाच्या खोलीत राहून शेतकºयांच्या सुखी जीवनासाठी धडपडणाºया या जागतिक कीर्तिच्या शास्त्रज्ञाचा स्मृतिदिन मंगळवारी (३० आॅक्टोबर) रोजी नुकताच पार पडला.
मोहन धोंडे यांनी ३५ वर्षांपूर्वी धोंडे सरांची ओळख करून दिली़ धोंडे सरांनी डोंगरावर कंटुर मार्करचा शोध लावल्याचे सांगितले होते़ हजारो एकरावर कंटुर मार्करच्या सहाय्याने सलग चर खणून उघड्या बोडख्या डोंगरांना हिरवळीचे स्वरूप प्राप्त करून दिले होते़ यासंदर्भात अधिकारी व स्वयंसेवी संस्थांना प्रशिक्षण देऊन कंटुर मार्कर किती महत्वाचे आहे याची प्रचिती करून दिली होती़
धोंडे सरांचे कंटुर केवळ महाराष्ट्राच्या सीमेपुरते मर्यादित राहिले नाही़ उत्तर प्रदेश, गुजरात, केरळ, राजस्थान, मध्यप्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश आदी राज्यात कंटूर फोफावले़ धोंडे सर सांगत, कंटुर म्हणजे डोंगर टेकड्यांवर सम पातळीत सलग घेतलेले चऱ अगणित चर खोदून डोंगरावर कित्येक अब्ज झाडे उभी राहिली़ धोंडे सरांच्या संशोधनातून सलग चराच्या माध्यमातून आजही कोट्यवधी झाडे हवेच्या झोकात डोलत आहेत़
शेतकºयांची कामे सुलभ व्हावी म्हणून धोंडे सरांनी सारा यंत्राचा शोध लावला़ कंटूर मार्करचा वापर करून शेतकरी अथवा विद्यार्थी जमिनीची उंची मोजू लागला़ सरांच्या उपकरणाची दखल तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनीही घेतली़ नाईक यांनी धोंडे सरांशी प्रत्यक्ष संपर्क केला़ समचर पध्दती समजून घेतली़ सडे गावासारख्या खेड्यातून आलेला शेतकºयाचा मुलगा एवढे मोठे काम करू शकतो हे पाहून त्यांच्या पाठीवर शाबासकीची थापही टाकली़
कंटुर मार्कर पेटंट विकून धोंडे सरांना मोठी रक्कमही मिळाली असती़ मात्र त्यांना प्रत्यक्ष शेतकºयांच्या शेतात ते वापरायचे होते़ मात्र उद्योगाची कास धरलेल्या धोंडे सरांना लघुउद्योग फायद्यात आणता आलाच नाही़ धोंडे सरांच्या संशोधनाची दखल घेत पुण्याच्या मराठा चेंबरने त्यांना पुरस्कार देऊन सन्मानित केले़ पाणी अडविण्यासाठी डोंगराचा माथा ते पायथा असे नियोजन केले पाहिजे हे धोंडे सर समजून सांगत़ शेती फायदेशीर ठरावी म्हणून पाण्याचे गणित मांडीत असत़ पावसाच्या पाण्याचा प्रत्येक थेंबाचा उपयोग केला तर दुष्काळ पडणार नाही, असे धोंडे सर ठामपणे सांगत़
भाऊसाहेब येवले