श्रीरामपूरच्या शेतकऱ्याला नाशिकच्या व्यापाऱ्याने फसविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2020 12:20 PM2020-11-04T12:20:37+5:302020-11-04T12:20:48+5:30
तालुक्यातील खंडाळा येथील एका शेतकऱ्याची डाळिंबाची व्यापाऱ्याने १५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात व्यापाऱ्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
श्रीरामपूर : तालुक्यातील खंडाळा येथील एका शेतकऱ्याची डाळिंबाची व्यापाऱ्याने १५ लाख रुपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात व्यापाऱ्याविरूद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय ढोकचौळे तसेच इतर शेतकऱ्यांनी १५ लाख ७२ हजार रुपयांच्या डाळिंबाची अकबल अल्लाउद्दीन तांबोळी (रा.पिंपळगाव केतकी, ता.दिंडोरी, जि.नाशिक) याला विक्री केली होती. मालाच्या बदल्यात तांबोळी याने शेतकऱ्यांना राष्ट्रीयीकृत बँकेचे धनादेश दिले. मात्र, ते बँकेतून न वटताच परत आले. त्यामुळे शेतकऱ्यांना तांबोळी याला फोनवरून वारंवार विचारणा केली. त्याच्या घरी जाऊन शोध घेतला. मात्र, तांबोळी याने उडवाउडवीची उत्तरे दिली. आता राहत्या घरी तो मिळून येत नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. तालुका पोलीस ठाण्यात ढोकचौळे यांनी फिर्याद दिली. आरोपीचा शोध घेतला जात आहे.