श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2018 19:09 IST2018-04-13T19:00:04+5:302018-04-13T19:09:41+5:30
कर्जाला कंटाळून शेतक-याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील पिंप्री कोलंदर येथे आज(दि. १३) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.

श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्याची कर्जाला कंटाळून आत्महत्या
देवदैठण(जि.अहमदनगर) : कर्जाला कंटाळून शेतक-याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना श्रीगोंदा तालुक्यातील पिंप्री कोलंदर येथे आज(दि. १३) पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली.
आबासाहेब निंभोरे असे मृत शेतक-याचे नाव आहे. याबाबत मयत निंभोरे यांचे मेहुणे लीलाधर ओहोळ यांनी बेलवंडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. फिर्यादीत त्यांनी म्हटले आहे, की मयत निंभोरे यांनी शिरूर (जि. पुणे) येथील कार्पोरेशन बँकेचे कर्ज घेतले होते. या कर्जाची ते परतफेड करू शकत नव्हते. याच विवंचनेत ते सतत होते. शुकवारी पहाटे त्यांची आई लहानुबाई निंभोरे यांच्या ओरडण्याच्या आवाजामुळे आजूबाजूचे लोक जमा झाले. तेव्हा शेतकरी निंभोरे यांनी शेजारील आंब्याच्या झाडाला दोरीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. पुढील तपास बेलवंडी पोलीस ठाण्याचे रावसाहेब शिंदे करीत आहेत.