जामखेड तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2018 20:12 IST2018-04-18T20:11:34+5:302018-04-18T20:12:12+5:30
तालुक्यातील सरदवाडी येथील धोंडीराम भानुदास शिरसाट (वय ४२) या तरूण शेतक-याने कर्जबाजारीपणास कंटाळून बुधवारी पहाटे आत्महत्या केली.

जामखेड तालुक्यात कर्जबाजारीपणामुळे शेतकऱ्याची आत्महत्या
जामखेड : तालुक्यातील सरदवाडी येथील धोंडीराम भानुदास शिरसाट (वय ४२) या तरूण शेतकºयाने कर्जबाजारीपणास कंटाळून बुधवारी पहाटे आत्महत्या केली.
बुधवारी पहाटे ६ वाजेपूर्वी धोंडीराम यांनी अशोक रामा गाडे यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. भारतीय स्टेट बँकेकडून कर्ज काढून ते ऊस तोडणीसाठी गेले होते. परंतु जमीन दीड एकर असल्याने त्यातून मिळणाºया जेमतेम उत्पन्नामुळे बँकेचे कर्ज भरणे अवघड झाले होते. त्यातूनच आलेल्या नैराश्यातून बुधवारी गळफास घेऊन त्यांनी आपली जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पाठीमागे दोन मुले व पत्नी आहे. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक नितीन पगार यांच्या मार्गदर्शनाखाली हेडकाँस्टेबल शबाना शेख तपास करीत आहेत.