अहमदनगर: शेतकरी पुतळ्याला दुधाचा अभिषेक, दिंडी काढून पुणतांब्यात आंदोलनाला सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 11:12 IST2022-06-01T11:12:00+5:302022-06-01T11:12:43+5:30
या दिंडीत शेतकऱ्या सोबत महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

अहमदनगर: शेतकरी पुतळ्याला दुधाचा अभिषेक, दिंडी काढून पुणतांब्यात आंदोलनाला सुरुवात
अहमदनगर: राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे शेतकरी, ग्रामस्थांनी आंदोलनाला सुरवात केली. आंदोलकांनी दिलेल्या ठरावाला सरकारने मुदतीत प्रतिसाद दिला नसल्याने धरणे आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. पाच दिवसाच्या आत जर सरकारने या आंदोलन व मागण्याचा विचार केला नाही तर हे आंदोलन आणखीन तीव्र करणार असल्याचे किसान क्रांतीतर्फे शेतक-यांनी माध्यमांशी बोलताना निर्धार व्यक्त केला.
आजच्या धरणे आंदोलनाची सुरवात पुणतांबा येथील ग्राम सचिवालय जवळ असलेल्या शेतकरी पुतळ्याला दुग्ध अभिषेक, पुष्पहार घालून प्रारंभ करण्यात आला. त्याच प्रमाणे गावातून शेतकरी दिंडी काढण्यात आली. या दिंडीत शेतकऱ्या सोबत महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.