शेतकऱ्यांचा यंदा कांदा साठवणुकीवरच भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 9, 2021 04:21 AM2021-05-09T04:21:41+5:302021-05-09T04:21:41+5:30

रुईछत्तीसी : कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकऱ्यांनी आता साठवणुकीवर भर दिला आहे. त्यामुळे सध्या नगर तालुक्यातील रुईछत्तीसी परिसरात वखारीत कांदा ...

Farmers are focusing on onion storage this year | शेतकऱ्यांचा यंदा कांदा साठवणुकीवरच भर

शेतकऱ्यांचा यंदा कांदा साठवणुकीवरच भर

रुईछत्तीसी : कांद्याचे भाव गडगडल्याने शेतकऱ्यांनी आता साठवणुकीवर भर दिला आहे. त्यामुळे सध्या नगर तालुक्यातील रुईछत्तीसी परिसरात वखारीत कांदा टाकण्याची लगबग सुरू आहे.

रुईछत्तीसी परिसरात यंदा झालेल्या समाधानकारक पावसामुळे कांद्याची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात आली. इतर पिकांच्या तुलनेत शेतकऱ्यांना कांदा जास्त उत्पन्न मिळवून देतो. सध्या एक हजार रुपये प्रतिक्विंटल कांद्याला भाव मिळत आहे. शेतकऱ्यांना सध्या तरी तो विक्रीसाठी परवडत नाही. त्यामुळे रुईछत्तीसी परिसरात ५०० हेक्टरवर लागवड केलेला कांदा काढून पडला आहे. बाजारभाव समाधानकारक नसल्याने शेतकऱ्यांची वखारीत कांदा टाकण्याची लगबग सुरू आहे. दरवर्षीप्रमाणे कांदा सडण्याचे प्रमाण जास्त असल्याने वखारीत टाकलेला कांदा जास्त काळ टिकू शकत नाही, अशी चिंता शेतकऱ्यांसमोर आहे.

यावर्षी वातावरण सारखे ढगाळ असल्याने कांदा पीक जास्त पोषक बनले नाही. वखारीत जास्त काळ कांदा टिकू शकला नाही तर शेतकरीसुद्धा मोठ्या आर्थिक संकटात सापडणार आहेत.

वखारी बनविण्यासाठीही मोठा आर्थिक खर्च सोसावा लागत आहे. त्यातच लॉकडाऊनमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. वखारीचा गोणीनिहाय खर्च १०० गोणी- २० हजार रुपये, २०० गोणी- ४० हजार रुपये, ३०० गोणी-६० हजार रुपये. कांद्याशिवाय शेतकऱ्यांना मोठा कोणता दुसरा आधार नाही; परंतु अपेक्षित भाव नसल्याने शेतकऱ्यांना कांदा साठवून ठेवावा लागतो आणि त्यासाठी येणारा मोठा खर्च पेलवत नसल्याने कृषी विभागाने कांदा वखारींसाठी सर्वच शेतकऱ्यांना अनुदान देण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

---

०८ कांदा न्यूज

रुईछत्तीसी परिसरात शेतकऱ्यांनी अशा कांद्यासाठी वखारी बनविल्या आहेत.

Web Title: Farmers are focusing on onion storage this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.