रांजणगावमध्ये लाभक्षेत्रातील शेतक-यांनी आमदार पिचडांचा पुतळा जाळला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2018 05:43 PM2018-12-21T17:43:00+5:302018-12-21T17:43:43+5:30
निळवंडेच्या कालव्यासाठी निधी मिळूनही प्रत्यक्षात काम सुरु होत असताना अकोले तालुक्याचे आमदार वैभव पिचड त्या कामास विरोध करत असल्याने कोपरगाव
कोपरगाव : निळवंडेच्या कालव्यासाठी निधी मिळूनही प्रत्यक्षात काम सुरु होत असताना अकोले तालुक्याचे आमदार वैभव पिचड त्या कामास विरोध करत असल्याने कोपरगाव तालुक्यातील निळवंडे लाभक्षेत्रातील रांजणगाव देशमुख येथे आज शेतक-यांनी आमदार वैभव पिचड यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळून निषेध केला.
निळवंडे धरणाच्या पाण्याची १८२ गावातील शेतकरी चातकाप्रमाणे वाट पाहत आहेत. ४५ वर्षापासून हे काम रखडलेले आहे. आता निधी उपलब्ध झाल्याने हे काम पूर्ण होण्याची आशा निर्माण झाली आहे. हे काम लवकर व्हावे ही लाभधारक गावांची अपेक्षा आहे. पंरतु हे काम अकोले तालुक्यात बंद पाडण्यात आले. हे चुकीचे असून कालव्यांच्या कामांना अडथळा आणू नये. अनेक शेतक-यांचे कुटुंब या पाण्याची वाट पाहत आहेत. आमदार पिचड यांनी शेतक-यांची समजुत काढण्याऐवजी त्यांची दिशाभूल करुन राजकारण करु नये. प्रशासनाने निळवंडे धरणाच्या कालव्यांचे काम तातडीने सुरु नाही केले तर शेतकरी आमदार पिचड यांच्या घरासमोर येऊन आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
याप्रसंगी निवृत्ती गोर्डे, तात्याभाऊ खालकर, चंद्रकांत ठोंबरे, धनंजय वर्पे, बाळासाहेब भागवत, जालींदर खालकर, पंढरीनाथ खालकर, अनिल खालकर, प्रकाश गोर्डे, नानासाहेब वर्पे, गजानन मते, हरीभाऊ गुडघे, विरेंद्र वर्पे, रोषन गुडघे, अजीत गुडघे, अरुण वर्पे, विजय कोटकर, संजय आरणे, दत्तात्रय देशमुख, लक्ष्मण गोर्डे, विजय खालकर, रविंद्र कोल्हे, संजय खालकर, भारत देशमुख, शहाजी वर्पे यांच्यासह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.