दूधदरवाढीसाठी शेतक-यांनी हैदराबाद मार्ग अडविला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2018 04:46 PM2018-06-04T16:46:43+5:302018-06-04T16:47:36+5:30
दूध दरवाढ व शेतक-यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी शिर्डी ते हैदराबाद राज्यमार्गावर आनंदवाडी जवळच्या लोणी फाटा (ता. जामखेड) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस व दूध उत्पादक शेतक-यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
खर्डा : दूध दरवाढ व शेतक-यांच्या विविध प्रश्नांकडे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी शिर्डी ते हैदराबाद राज्यमार्गावर आनंदवाडी जवळच्या लोणी फाटा (ता. जामखेड) येथे स्वाभिमानी शेतकरी संघटना, राष्ट्रवादी काँग्रेस व दूध उत्पादक शेतक-यांच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
सतत शेतक-यांवर अन्याय करणाºया फसव्या सरकारच्या निषेधार्थ शेतक-यांच्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करावे लागत असल्याची खंत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. मधुकर राळेभात यांनी व्यक्त केली. यावेळी ते म्हणाले, रास्ता रोको आंदोलन सुरू होण्यापूर्वी बंदोबस्त करण्यासाठी पोलीस प्रशासन आंदोलनस्थळी उपस्थित होते. परंतु शेतक-यांच्या मागण्या मान्य होण्यासाठी शेतकरी आंदोलन करतो, तेव्हा प्रशासनाचा माणूस लवकर येत नाही. सरकारला शेतकºयांच्या मागण्यांचे काही देणे घेणे नाही.
दीड ते दोन तास चाललेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे वाहनांच्या दूरवर रांगा लागल्या होत्या. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुनील लोंढे, राष्ट्रवादी काँग्रेसचे स्वप्निल खाडे, माजी जिल्हा परिषद सदस्य शहाजी राळेभात, अमित जाधव, शेतकरी संघटनेचे भीमराव लेंडे आदी मान्यवरांची आंदोलकांसमोर भाषणे झाली.
रास्ता रोको आंदोलनात नायगाव, नाहुली, दरडवाडी, आनंदवाडी, वाकी, लोणीसह जामखेड तालुक्यातील व परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासकीय अधिकाºयांची उदासीनताप्रशासकीय अधिकाºयांची आंदोलनाबाबत उदासीनता
------------------
प्रशासकीय अधिकाºयांची उदासीनता
यावेळी उपस्थित नेते व शेतक-यांनी पेट्रोल-डिझेल इंधनाची वाढती दरवाढ कमी करावी, प्रत्येक शेतमालाला हमीभाव, दुधाला प्रति लिटर ४० रूपये दर द्यावा, स्वामिनाथन आयोगाची अंमलबजावणी करावी, शेतकºयाला कुटुंबासह पेन्शन द्यावी, शेतीचा सातबारा संपूर्ण कोरा करून कर्जमाफी द्यावी अशा विविध मागण्यांचे निवेदन जामखेड तहसील कार्यालयाचे प्रतिनिधी एस. आर. कोळी, जामखेडचे सहायक पोलीस निरीक्षक नितीन पगार यांना देण्यात आले. यावेळी सरकारी अधिकारी, प्रतिनिधी येण्यास उशीर झाल्यामुळे उपस्थित नेते, पदाधिकारी व शेतकºयांनी प्रशासकीय अधिकाºयांचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला.