संगमनेर तालुक्यात कर्जाला कंटाळून शेतक-याची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 06:30 PM2019-01-24T18:30:39+5:302019-01-24T18:31:29+5:30
संगमनेर तालुक्यातील कनोली येथील शेतक-याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहात्या घरात विष पिऊन आत्महत्या केली.
आश्वी : संगमनेर तालुक्यातील कनोली येथील शेतक-याने कर्जबाजारीपणाला कंटाळून राहात्या घरात विष पिऊन आत्महत्या केली.
दत्तात्रय नानासाहेब वर्पे (वय 38, रा.कनोली) या तरुण शेतक-याने कर्जबाजारी पणाला कंटाळून राहात्या घरात विष पिउन आत्महत्या केली. गुरुवारी सकाळी सुमारास पत्नी शेतात पाणी भरण्यासाठी गेली असता घरात कोणी नसल्याचे बघून राहात्या घरात विष प्राशन केले. पत्नी घरी आली असता तिला औषधाचा वास आल्याने तिने शेजारी राहत असलेल्या सास-यांना माहिती दिली. संगमनेर येथे उपचारासाठी हालविले मात्र उपचारापुर्वीच वर्पे मृत्यू झाला. घटनेची माहिती कामगार पोलीस पाटील नानासाहेब वर्पेे यांनी आश्वी पोलीस स्टेशन व संगमनेर तहसील कार्यालयास कळविली. दत्तात्रय वर्पे यांच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे.