शेतकरी संप : पारनेरमध्ये अडवला मुंबईकडे जाणारा भाजीपाला

By Admin | Published: June 1, 2017 02:00 PM2017-06-01T14:00:09+5:302017-06-01T14:26:07+5:30

टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकात नगर-कल्याण महामार्गावर शेतक-यांचा रात्रभर पहारा.

Farmer's Contact: Vegetable which goes to Mumbai in Parner | शेतकरी संप : पारनेरमध्ये अडवला मुंबईकडे जाणारा भाजीपाला

शेतकरी संप : पारनेरमध्ये अडवला मुंबईकडे जाणारा भाजीपाला

आॅनलाइन लोकमत

पारनेर (अहमदनगर), दि. 1 - शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक झाले आहेत. यासाठी ते आजपासून संपावर गेले आहेत. याच पार्श्वभूमीवर टाकळी ढोकेश्वर येथील वासुंदे चौकात नगर-कल्याण महामार्गावर शेतक-यांनी रात्रीपासून पहारा ठेवला आहे.

मुंबई, पुण्याकडे जाणा-या १०० ते १५० भाजीपाला, दूध व इतर शेतीमाल घेऊन जाणारी वाहनेदेखील अडवण्यात आली आहेत.   यावेळी शिवप्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संजीव भोर व भूमिपुत्र संघटनेचे संस्थापक संतोष वाडेकर, अनिल देठे, सचिन सैद, किरण तराळ, अमोल रोकडे, सतीश पवार व टाकळी ढोकेश्वर गटातील शेतकरी उपस्थित होते.

पारनेर तालुक्यातील निघोजसह सर्व मोठ्या गावांमध्ये दूध, भाजीपाला विक्रीसाठी नेण्याचे शेतक-यांनी थांबवले आहे. तर भाळवणी-जामगाव रोडवर हॉटेल संग्राम समोरच्या चौकात दूध ओतून शेतक-यांनी आंदोलन केले.  यावेळी दुध उत्पादक शेतकरी ह.भ.प भाऊसाहेब रोहोकले, कानिफनाथ तरटे, साहेबराव तरटे, भास्कर चेमटे, भिमराज ठुबे, नानाभाऊ चेमटे, कामगार नेते शिवाजी रोहोकले, सोमेश्वर कृषी सेवा केंद्राचे संचालक सोपानराव वाळुंज, काशिनाथ कदम, रंगनाथ राऊत, यादव रोहोकले, रामदास जाधव, प्रमोद गोडसे, रावसाहेब चेमटे, संभाजी आमले, शिवाजी पट्टेकर,धनेश लोढा, मुक्ताजी चेमटे, आबासाहेब चेमटे, अनिल लकडे, विशाल राऊत उपस्थित होते.

(शेतकरी संप : बाजार पेठांमध्ये भाज्यांची आवक घटली)
 
राज्यातील शेतकरी कर्जमाफीसाठी आक्रमक झाला आहे. कर्जमाफी मिळावी यासाठी राज्यातील शेतकरी संपावर गेला आहे. आपल्या मागण्या सरकारनं मान्य कराव्यात यासाठी शेतक-यांनी संपाचे हत्यार उपसलं आहे. 
 
कर्जमाफी मिळत नसल्यानं शेतक-यांनी शेतीमाल रस्त्यांवर ओतून आपला संताप व्यक्त केला आहे. यामुळे बाजारांमध्ये भाजीपाल्याची आवक घटली आहे. 
 
 
 
 
 
पश्चिम महाराष्ट्रतील महत्त्वाची बाजार पेठ असलेल्या पुण्यातील मार्केटयार्डमध्ये आज 40 टक्के आवक कमी झाली असून भाजीपाल्याच्या भावात 10 ते 20 टक्के वाढ झाली आहे. यामुळे सर्वसामान्य ग्राहकांनी त्रास सहन करावा लागणार आहे.  
 
पुण्यातील मार्केटयार्डात पश्चिम महाराष्ट्र, कर्नाटकातून भाजीपाल्याची आवक होते. काल बाजारात 1022 गाड्या आवक झाली होती. आज केवळ 750 गाड्या आल्या. हा माल पुणे शहरासह सर्वत्र जातो. आज त्याचा फारसा परिणाम दिसला नसला, तरी शेतक-यांनी बेमुदत आंदोलन केल्यास याचा परिणाम नक्की जाणवेल.  

Web Title: Farmer's Contact: Vegetable which goes to Mumbai in Parner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.