कोरड्या विहिरीत शेतकऱ्याचे उपोषण
By Admin | Published: May 7, 2017 05:22 PM2017-05-07T17:22:30+5:302017-05-07T17:22:30+5:30
अकोले तालुक्यातील मन्याळे गावातील भैरवनाथ शंकर जाधव या शेतकऱ्याने कर्जमाफीसाठी कोरड्या विहिरीत उपोषण सुरु केले आहे़
आॅनलाईन लोकमत
अकोले (अहमदनगर), दि़ ७ - अकोले तालुक्यातील मन्याळे गावातील भैरवनाथ शंकर जाधव या शेतकऱ्याने कर्जमाफीसाठी कोरड्या विहिरीत उपोषण सुरु केले आहे़ जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत वर येणार नाही, असा निर्धार या शेतकऱ्याने केला आहे़
२००५ मध्ये जांधव यांनी घासाठी कर्ज उचलले होते़ मात्र, त्यानंतर सततचा दुष्काळ, पाण्याचा अभाव यामुळे शेतीतून पीक आले नाही़ त्यामुळे जाधव यांच्यावरील कर्जाचा डोंबर वाढत गेला़ कर्ज थकल्यामुळे त्यांच्या शेतीवर जप्ती येणार असल्याचे त्यांना सांगण्यात आले़ त्यामुळे त्यांनी थेट कोरड्या विहिरीत उतरुन उपोषण सुरु केले आहे़ जोपर्यंत कर्जमाफी होत नाही, तोपर्यंत आपण उपोषण सुरुच ठेवू़ तसेच शेतीवर जप्ती आल्यास विहिरीतच विष पिऊन आत्महत्या करु, अशा इशारा जाधव यांनी दिला आहे़ सोमवारी जाधव यांच्या जमिनीवर जप्ती येणार असल्याने त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते़