माळेवाडीत वीज पडून शेतकरी जखमी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:21 AM2021-03-23T04:21:29+5:302021-03-23T04:21:29+5:30
कोरडगाव : पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागातील माळेवाडी, खरवंडी, कासार, भारजवाडी, ढाकणवाडी परिसरात शनिवारी सायंकाळी गारपीट व वादळी पाऊस झाला. ...
कोरडगाव : पाथर्डी तालुक्यातील पूर्व भागातील माळेवाडी, खरवंडी, कासार, भारजवाडी, ढाकणवाडी परिसरात शनिवारी सायंकाळी गारपीट व वादळी पाऊस झाला. यात माळेवाडी येथे शेतकरी वीज पडून जखमी झाला आहे.
या पावसामध्ये शेतकऱ्याच्या मालाचे मोठे नुकसान झाले आहे. रब्बी हंगामातील ऊस, गहू, मका, भुईमूग, हरभरा, टरबुज, खरबूज आदी पिके भुईसपाट झाली आहेत. अगोदरच शेतीला भाव नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यातच हे स्मानी संकट आल्याने शेतकरी कोलमडला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून प्रती हेक्टर पंचवीस हजार रुपये मदत देण्याची मागणी वंचित बहुजन आघाडी, ऊसतोड मजूर कामगार आघाडीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष प्रा. दादासाहेब खेडकर यांनी केली आहे.
...
प्रकृती स्थिर
दरम्यान, माळेवाडी येथील शेतकरी माणिक ज्ञानोबा दराडे हे शनिवारी सायंकाळी शेतात काम करीत असताना त्यांच्या जवळच वीज पडली. ते जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी अहमदनगर येथील सरकारी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले.