अहमदनगर जिल्ह्यात शेतकऱ्यांचे जेलभरो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 06:09 AM2018-05-15T06:09:55+5:302018-05-15T06:10:02+5:30
सरसकट कर्जमाफीसह अन्य अन्य मागण्यांसाठी शहरासह नेवासा, श्रीरामपूर, राहाता आणि अकोले तालुक्यांत शेतकºयांनी सोमवारी पोलीस ठाण्यांवर मोर्चा काढत जेलभरो आंदोलन केले़
अहमदनगर : सरसकट कर्जमाफीसह अन्य अन्य मागण्यांसाठी शहरासह नेवासा, श्रीरामपूर, राहाता आणि अकोले तालुक्यांत शेतकºयांनी सोमवारी पोलीस ठाण्यांवर मोर्चा काढत जेलभरो आंदोलन केले़ आंदोलकांना अटक करून नंतर सुटका करण्यात आली़
राज्य शेतकरी सुकाणू समितीच्या वतीने राज्यभर जेलभरो आंदोलाची हाक देण्यात आली होती़ बच्चू मोढवे यांच्या नेतृत्वाखाली कृषी उत्पन्न बाजार समितीतील हमाल भवन येथून मोर्चा काढण्यात आला़ श्रीरामपूर येथे बाळासाहेब पटारे यांनी मोर्चाचे नेतृत्व केले. नेवासा येथे क्रांतिकारी शेतकरी पक्षाचे नेते व माजी आमदार शंकर गडाख यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला़ गडाख यांच्यासह शेतकºयांना अटक करून सुटका करण्यात आली़