वीज बिले भरण्यासाठी कामरगावचे शेतकरी सरसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:21 AM2021-03-08T04:21:03+5:302021-03-08T04:21:03+5:30

निंबळक : कृषिपंपाच्या थकबाकीबाबत महावितरण अधिकाऱ्यांसोबत कामरगावचे सरपंच तुकाराम कातोरे यांनी शेतकऱ्यांसमवेत एकत्रित चर्चा घडवून आणली. शेतकऱ्यांनी प्रत्येकी पाच ...

Farmers of Kamargaon rushed to pay their electricity bills | वीज बिले भरण्यासाठी कामरगावचे शेतकरी सरसावले

वीज बिले भरण्यासाठी कामरगावचे शेतकरी सरसावले

निंबळक : कृषिपंपाच्या थकबाकीबाबत महावितरण अधिकाऱ्यांसोबत कामरगावचे सरपंच तुकाराम कातोरे यांनी शेतकऱ्यांसमवेत एकत्रित चर्चा घडवून आणली. शेतकऱ्यांनी प्रत्येकी पाच हजार रुपये भरून एका दिवसात जवळपास आठ लाख रुपयांचा भरणा केला. त्यामुळे महावितरणने कृषिपंप सुरू केले.

महावितरणाच्या आवाहनाला शेतकऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देताच कृषिपंप चालू झाले.

कामरगाव येथील शेतावर असलेल्या विहिरी व विंधन विहिरींवरील कृषिपंपांची थकीत असणारी वीज बिले वसुलीसाठी महावितरण कंपनीने रोहित्र (डीपी) बंद केले होते. त्यामुळे शेतकऱ्यांची उभी पिके पाण्याअभावी करपू लागली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. ही बाब सरपंच तुकाराम कातोरे यांनी महावितरणचे केडगाव विभागाचे सहायक अभियंता रामदास ढाकणे यांच्या निदर्शनास आणून दिली.

त्यांच्या सोबत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये सहविचार सभा आयोजित केली. प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या कृषिपंपांची किमान पाच हजार रुपये रक्कम भरावी, असे सर्वानुमते ठरले. त्यानुसार शेतकऱ्यांनी थकीत रक्कम लगेच भरली. त्यानंतर महावितरणचे कर्मचारी संभाजी गायकवाड, विजय शिरसाठ, योगेश दळवी यांनी बंद केलेली सर्व रोहित्रे (डीपी) सुरू केली. त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. सध्या गावात ४५ रोहित्रे (डीपी) असून, ३३० ग्राहक आहेत. त्यातील बहुतेकांनी जवळपास ८ लाख रुपयांचा भरणा महाविरणकडे केला.

यावेळी माजी सरपंच वसंत ठोकळ, ग्रामपंचायत सदस्य संदीप ढवळे, आजी- माजी सैनिक संघटना अध्यक्ष प्रकाश ठोकळ, अनिल आंधळे, संदीप लष्करे, सिद्धांत आंधळे, विधितज्ज्ञ प्रशांत साठे, प्रा. मारुती आंधळे, पोपट ठोकळ, लक्ष्मण ठोकळ, जयसिंग ठोकळ, अरुण शिंदे, नितीन ठोकळ, अरुण ठोकळ, बाळासाहेब साठे मेजर आदी उपस्थित होते.

Web Title: Farmers of Kamargaon rushed to pay their electricity bills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.