खातगावातील शेतकरी अतिवृष्टी विम्यापासून वंचित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:17 AM2020-12-26T04:17:48+5:302020-12-26T04:17:48+5:30

कर्जत : कर्जत तालुक्यातील खातगाव शिवारात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाले. मात्र, हे पंचनामे बनावट व खोटे झाले ...

Farmers in Khatgaon are deprived of excess rain insurance | खातगावातील शेतकरी अतिवृष्टी विम्यापासून वंचित

खातगावातील शेतकरी अतिवृष्टी विम्यापासून वंचित

कर्जत : कर्जत तालुक्यातील खातगाव शिवारात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे झाले. मात्र, हे पंचनामे बनावट व खोटे झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना तुटपुंजी मदत मिळाली. या प्रकाराची चौकशी करावी व नुकसान झालेल्या प्रमाणात नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी खातगाव येथील शेतकऱ्यांनी कर्जत तहसीलदारांना निवेदनाद्वारे केली आहे.

गेल्या पावसाळ्यात कर्जत तालुक्यातील विविध भागांत समाधानकारक पाऊस झाला. कर्जत मंडळात ८३८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कर्जत तालुक्यातील सर्व पिकांचे पंचनामे झाले. खातगाव येथे पंचनामे झाले. परंतु, ते केवळ कागदावरच राहिले. पंचनाम्यासाठी आलेल्या पथकाने शेतकऱ्यांना बोलावून आवश्यक कागद घेतले. परंतु, ते शेतकऱ्यांच्या शेतात गेले नाहीत. त्यामुळे त्यांना प्रत्यक्ष नुकसानीचा अंदाज आला नाही. परिणामी शेतकऱ्यांना तुटपुंजी नुकसान भरपाई मिळाली. काही शेतकरी तर नुकसान भरपाईपासून वंचित राहिले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. खातगाव शिवारातील पिकांचे पंचनामे नव्याने करावेत व सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी खातगाव येथील शेतकऱ्यांनी कर्जतचे तहसीलदार नानासाहेब आगळेे यांच्याकडे केली आहे.

निवेदनावर सरपंच अर्जुन आटोळे, उपसरपंच उषा शिंदे, महेश ठाणगे, मच्छिंद्र गाढवे, महादेव गावडे राजाराम वाघ, मच्छिंद्र गायकवाड, देवराव शिंदे, नामदेव पाटोळे, अर्जुन तोरडमल, सुनिता फणसे, नानासाहेब रोटे, हनुमंत खाटमोडे, अंकुश पिटेकर, सत्तार शेख, बाळासाहेब येडे आदी शेतकऱ्यांच्या सह्या आहेत.

Web Title: Farmers in Khatgaon are deprived of excess rain insurance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.