कर्जमाफीसाठी पुणतांबा येथे शेतकऱ्यांचे धरणे आंदोलन
By Admin | Published: May 25, 2017 02:03 PM2017-05-25T14:03:34+5:302017-05-25T14:03:34+5:30
शेतकऱ्यांच्या भावनांचे गांभीर्य लक्षात यावे, यासाठी जिल्हाभरातून पुणतांबा येथे आलेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळपासून धरणे आंदोलन सुरु केले आहे़
आॅनलाईन लोकमत
राहाता, दि़ २५ - शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी, यासाठी १ जूनपासून शेतकरी संपावर जाणार आहेत़ तत्पूर्वी सरकारला शेतकऱ्यांच्या भावनांचे गांभीर्य लक्षात यावे, यासाठी जिल्हाभरातून पुणतांबा येथे आलेल्या शेतकऱ्यांनी गुरुवारी सकाळपासून धरणे आंदोलन सुरु केले आहे़
१ जूनपासून शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी १ जूनपासून शेतकरी संपावर जाणार आहेत़ पुणतांबा हे या संपाचे केंद्र असणार आहे़ त्यामुळे पुणतांबा येथे राज्यभरातून शेतकरी दाखल होणार आहेत़ गुरुवारी सकाळी ११ वाजता महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केल्यानंतर धरणे आंदोलनास सुरुवात करण्यात आली़ या आंदोलनात शेतकरी संघटनेचे अनिल घनवट, धनंजय जाधव, संदीप गिऱ्हे, योगेश रायते, शंकर दरेकर, किरण सुराळकर, सुहास वहाडणे, सुधाकर जाधव, संभाजी गमे, अशोक धनवटे, बाळासाहेब जाधव, गणेश बनकर, संजय जाधव, गणपत वाघ, सर्जेराव जाधव आदींनी सहभाग घेतला आहे़
दरम्यान कोपरगावच्या आमदार स्नेहलता कोल्हे, भाऊसाहेब वाकचौरे यांनी संपकरी शेतकऱ्यांना भेटून सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत सकारात्मक असून, आंदोलन मागे घेण्याची विनंती केली़ मात्र, शेतकरी आंदोलनावर ठाम राहिले़