मुख्यमंत्री पदापेक्षा शेतक-यांचे प्रश्न महत्वाचे : उध्दव ठाकरे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 03:41 PM2019-06-23T15:41:19+5:302019-06-23T17:34:41+5:30
मुख्यमंत्री कोणाचा होणार ? हा प्रश्न माझ्यासाठी गौण आहे. शेतक-यांचे प्रश्न सोडविण्याला आपले प्राधान्य आहे.
श्रीरामपूर : मुख्यमंत्री कोणाचा होणार ? हा प्रश्न माझ्यासाठी गौण आहे. शेतक-यांचे प्रश्न सोडविण्याला आपले प्राधान्य आहे. कारण शेतक-यांच्या मनातील चीड उफाळून आल्यास सत्तेची आसने खाक होतील, असा इशारा शिवसेना प्रक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
पीक विमा केंद्राच्या उदघाटनासाठी ठाकरे हे श्रीरामपूरला आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
ठाकरे म्हणाले, कर्जमाफी व पीक विम्याचा लाभ किती शेतकऱ्यांना मिळाला. यावर ठाकरे यांनी उपस्थितांना हात उंचविण्याचे आवाहन केले. मात्र बोटावर मोजण्याइतकेच हात वर आले. त्यावर शेतकºयांना न्याय मिळवून देण्याची शिवसेनेची भूमिका आहे. तालुक्यात प्रत्येक ठिकाणी पीक विमा केंद्र सुरू करा. शिवसेना पदाधिकाºयांनी घरोघरी जाऊन त्याबाबत शेतकºयांना माहिती द्या. शिवसेनेची शेतक-यांच्या प्रश्नावर नेहमीच लढण्याची भूमिका राहिली. पुणतांबे येथील शेतक-यांनी संपावेळी भेट घेतली असता मी विनाअट पाठिंबा दिला. इतर पक्षातील नेते आंदोलनापासून सावध भूमिका बाळगून होते याकडेही त्यांनी लक्ष वेधले. अन्नदाता सुखी राहिला पाहिजे. त्याचा बळी देण्याचे पाप आपण कदापी करणार नाही. शिवसेनेची ताकद ही तुम्ही आहात. तुमच्या हक्काच्या आड कोण येतो ते पाहतो, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. शिवसेना खासदार लोखंडे यांना सलग दुसºयांदा विजयी केल्याने मी येथील मतदारांच्या ऋणी आहे. आता पक्षाचे खासदार, आमदार यांनी जनतेच्या दारापर्यंत जायला पाहिजे. ज्यांनी सत्ता दिली त्यांचे अश्रू पुसायला जा. सरकारच्या योजना गरिबांपर्यंत जातात की नाही हे लोकप्रतिधिंनी पहायला हवे
एकनाथ शिंदे म्हणाले, शिवसेनेने सत्तेत राहूनही कधीही शेतकºयांच्या प्रश्नावर तडजोड केली नाही. शेतकºयांना पूर्ण कर्जमाफी याला आमची प्राथमिकता होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांनी त्याकरिता संपूर्ण राज्याचा झंझावती दौरा केला. यापुढेही आपला संघर्ष सुरूच राहील.
यावेळी मंत्री एकनाथ शिंदे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार सुनील शिंदे, मिलिंद नार्वेकर, संजय घाडी, संपर्क प्रमुख आमदार नरेंद्र दराडे, भाऊ कोरेगावकर, माजी आमदार अनिल राठोड, जिल्हा प्रमुख रावसाहेब खेवरे, राजेंद्र झावरे, डॉ.महेश क्षीरसागर, विजय काळे, सभापती दीपक पटारे, डॉ.चेतन लोखंडे, सचिन बडधे, राजेंद्र देवकर, निखिल पवार, संभाजी कºहाड, दादासाहेब कोकणे, गिरीधर आसने, भाऊसाहेब बांद्रे, बाबासाहेब चिडे, संकेत संचेती आदी उपस्थित होते.