टाकळीभान येथे शेतकऱ्यांचा रास्तारोको : दुष्काळी यादीत समावेशाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2019 04:41 PM2019-03-01T16:41:09+5:302019-03-01T16:41:48+5:30
तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा व सरकारने नव्याने सर्वेक्षण करून दुष्काळी सवलती जाहीर कराव्यात या प्रमुख मागणीसाठी सर्व पक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
टाकळीभान : तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा व सरकारने नव्याने सर्वेक्षण करून दुष्काळी सवलती जाहीर कराव्यात या प्रमुख मागणीसाठी सर्व पक्षीय पदाधिकारी व ग्रामस्थांच्या वतीने श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
एक तास सुरू असलेल्या आंदोलनामुळे रस्त्यावर दुतर्फा वाहनांची मोठी रांग लागली होती. मंडळाधिकारी बाबासाहेब जाधव यांनी निवेदन स्वीकारून सरकार दरबारी भावना पोहचविण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी तलाठी आकांक्षा ढोके उपस्थित होत्या. माजी सभापती नानासाहेब पवार म्हणाले, मागील वर्षी कमी पाऊस पडल्याने तालुक्यात भीषण दुष्काळी व टंचाईसदृश्य परिस्थिती आहे. त्यातच हक्काचे पाटपाणी समन्यायी पाणीवाटप कायद्यामुळे जायकवाडी धरणात सोडण्यात आले आहे. त्यामुळे खरिपाचे व रब्बीचे पिक वाया गेलेले आहे. भीषण पाणीटंचाई आहे.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यात दुष्काळ जाहीर केलेला असून श्रीरामपूरवर मात्र अन्याय झाला आहे. तालुक्याच्या आमदारांनी त्यासाठी अजिबात प्रयत्न केला नाही, असा आरोप पवार यांनी केला.
यावेळी अविनाश लोखंडे, नवाज शेख, राहूल पटारे, नारायण काळे, राजेंद्र कोकणे, बापूसाहेब शिंदे, उपसरपंच पाराजी पटारे, चित्रसेन रणनवरे यांनी प्रशासनावर टीकास्त्र सोडले. शिवसेनेचे दादासाहेब कोकणे, भाऊसाहेब पवार, शिवाजीराव धुमाळ, ग्रामपंचायत सदस्य कान्हा खंडागळे, रिपाइंचे आबासाहेब रणनवरे राजेंद्र रणनवरे, शंकर शिंदे, भारत भवार, आप्पासाहेब रणनवरे, विलास दाभाडे, गजानन कोकणे, अप्पासाहेब कापसे, प्रकाश दाभाडे, अक्षय कोकणे आदी सहभागी झाले.