ऊसतोडणीअभावी शेतकऱ्यांची धावपळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 04:51 AM2021-01-13T04:51:04+5:302021-01-13T04:51:04+5:30
राहुरी येथील तनपुरे कारखाना अवघा ३५ हजार टन गाळप करू शकला आहे. राहुरी कारखाना वारंवार बंद पडत ...
राहुरी येथील तनपुरे कारखाना अवघा ३५ हजार टन गाळप करू शकला आहे. राहुरी कारखाना वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचा ऊस शेतात पडून आहे. राहुरी तालुक्यात उसाचे क्षेत्र यंदा वाढले असल्याने शेतकऱ्यांचा ऊस शेतात शिल्लक आहे. वेळेत ऊस न गेल्याने शेतकऱ्यांची गहू, कांदा, घास व अन्य रबी पिके हुकली आहेत. लॉकडाऊनमुळे शेतमालाचे भाव पडले आहेत. एकमेव हक्काचे पीक म्हणून उसाकडे पाहिले जाते. मात्र, ऊस वेळेवर जात नसल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. राहुरी तालुक्यात बाहेरील कारखाने ऊस तोडण्यासाठी राहुरीच्या कार्यक्षेत्रात आले आहेत.
ऊसतोडणी कामगार ऊस तोडण्यासाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावर पैशांची मागणी करत आहेत. ऊसतोडणीचे पैसे दिल्याशिवाय शेतकऱ्यांचा ऊस तोडला जात नाही. नाइलाजाने शेतकऱ्यांना पैसे द्यावे लागत आहेत. जानेवारीअसून शेतकऱ्यांना ऊसतोडणी कामगार वाढे देत नाहीत.