शेवगाव तालुक्यातील शेतक-यांना बोंडअळीच्या नुकसानाची ९ कोटीची रक्कम प्राप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2018 05:37 PM2018-05-15T17:37:45+5:302018-05-15T17:39:19+5:30
बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीच्या उत्पन्नाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसलेल्या शेवगाव तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अनुदानाच्या रक्कमेपैकी ८ कोटी ७५ लाख ३२ हजार रुपयांची रक्कम प्राप्त झाल्याची माहिती तहसील कार्यालयातील टंचाई शाखेतून देण्यात आली.
शेवगाव : बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे कपाशीच्या उत्पन्नाला मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसलेल्या शेवगाव तालुक्यातील कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मंजूर अनुदानाच्या रक्कमेपैकी ८ कोटी ७५ लाख ३२ हजार रुपयांची रक्कम प्राप्त झाल्याची माहिती तहसील कार्यालयातील टंचाई शाखेतून देण्यात आली.
गेल्या काही वर्षात कापूस उत्पादनात तालुक्याने जिल्ह्यात आघाडी घेतली आहे. मागील वर्षीच्या खरीप हंगामात तालुक्यात विक्रमी ५० हजार हेक्टर क्षेत्रात कपाशीची लागवड झाली. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात तालुक्यात ६३२ मि.मी. वार्षिक सरासरी प्रर्जन्यमानाच्या ११२ टक्के पावसाची नोंद झाली, मात्र बोंडअळीच्या उद्भवलेल्या संकटामुळे कापूस उत्पादनास मोठ्या प्रमाणात फटका बसून कापूस उत्पादक शेतकºयांचे शेतीचे अर्थकारण कोलमडले आहे.
शेतकºयांच्या नुकसानीचे पंचनामे तालुका कृषी कार्यालयाकडून करण्यात येऊन तालुक्यातील ११२ गावातील ५७ हजार ५०५ शेतकºयांचे जवळपास ४७ हजार १९२ हेक्टर क्षेत्रातील कपाशीचे पीक बाधीत झाल्याचा व तालुक्यासाठी ३२ कोटी ९ लाख रुपये अनुदानाच्या रक्कमेचा प्रस्ताव शासनाकडे सादर करण्यात आला. शासनाने बोंडअळीच्या नुकसानीचे अनुदान तीन टप्प्यात संबंधित शेतकºयांना अदा करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार शेवगाव तालुक्यासाठी ८ कोटी ७५ लाख रुपयाची रक्कम उपलब्ध झाली असून संबंधित कापूस उत्पादक शेतक-यांच्या बँक खात्यावर अनुदानाची ही रक्कम तातडीने वर्ग करण्यात येणार असल्याचे तहसीलदार दीपक पाटील यांनी सांगितले.
शेतक-यांच्या मागणीची दखल
कापूस उत्पादक शेतक-यांना बोंडअळीच्या प्रादुभार्वाच्या अनुदान प्रक्रियेत जिल्ह्यात सर्वात जास्त कापसाची लागवड असलेल्या शेवगाव तालुक्याचा समावेश नसल्याची कापूस उत्पादक शेतकºयांच्या चर्चेची दखल घेऊन आमदार मोनिका राजळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन बोंडअळीच्या नुकसानीच्या अनुदानात शेवगाव तालुक्याचा प्राधान्याने समावेश करण्याची मागणी केली. त्यानुसार शेवगाव तालुक्यासाठी ३२ कोटी रुपयांची रक्कम मंजूर झाली. यापैकी ८ कोटी ७५ लाख रुपये उपलब्ध झाली.