शेतक-यांचे धाडस : मुळा पात्रातून वाळू तस्करांच्या आवळल्या मुसक्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2018 08:12 PM2018-06-02T20:12:32+5:302018-06-02T20:12:46+5:30

मुळा नदी पात्रातुन वाळूची वाहतुक होणारे रस्ते संतप्त झालेल्या शेतक-यांनी आज चक्क उध्दवस्त करून आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. रस्ते ठिकठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने उकरल्याने वाळू वहातुकीला बे्रक बसण्यास मदत होणार आहे.

Farmers' Stunt: Sandwich Smile from Radish Water | शेतक-यांचे धाडस : मुळा पात्रातून वाळू तस्करांच्या आवळल्या मुसक्या

शेतक-यांचे धाडस : मुळा पात्रातून वाळू तस्करांच्या आवळल्या मुसक्या

राहुरी : मुळा नदी पात्रातुन वाळूची वाहतुक होणारे रस्ते संतप्त झालेल्या शेतक-यांनी आज चक्क उध्दवस्त करून आपल्या नाराजीला वाट मोकळी करून दिली. रस्ते ठिकठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने उकरल्याने वाळू वहातुकीला बे्रक बसण्यास मदत होणार आहे.
मुळा नदी पात्रात परवा पहाटे शेतक-यांच्या तब्बल दहा विद्युत मोटारी चोरीस गेल्या होत्या. त्यामुळे शेतकरी वर्गात संतप्त खदखद व्यक्त करीत होता़न् ादी पात्रातील रस्ते वाळू वाहतुकीसाठी वापरण्यात येत होते. त्याचे रस्त्याने वाहानाव्दारे मोटारी चोरून नेण्यात आल्या होत्या. यासंदर्भात राहुरी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हाही दाखल करण्यात आला. शेतक-यांनी नदीपात्रातील रस्ते उध्द्वस्त करण्याची मागणी तहसीलदार अनिल दौंडे यांच्याकडे केली होती. 
आज शनिवारी संध्याकाळपर्यंत जेसीबीच्या सहाय्याने रस्ते बंद करण्यात आले.  वाळू तस्करांमुळे कुणीही जेसीबी चालक नदी पात्रात येण्यास तयार नव्हता़. महसुल विभागाने पाठपुरावा केल्यानंतर जेसीबीच्या सहाय्याने ठिकठिकाणी रस्ते फोडण्यात आले. मुळा नदी वाळू उचलल्यामुळे २५ फुट खोल झाल्याने विहीरींच्या पाण्याने तळ गाठला आहे. नदी पात्रात शेतक-यांना फिरण्यासही वाळू तस्करांकडून मज्जाव केला जात होता. आज शेतकरी मुळा नदी पात्रात जेसीबीसह आल्यानंतर कुणीही वाळू तस्कार नदीपात्राकडे फिरकला नाही़ मुळा नदी पात्रातील रस्ता बे्रक झाल्याने शेतक-यांनी समाधान व्यक्त केले आहे.


मुळा नदी पात्रातून वाळूची वाहतूक करण्यासाठी रस्ता तयार करण्यात आला होता़.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वाळूची चोरी होत होती. चोरटयांनी विद्युत मोटारी चोरण्याचे सत्र सुरू केले़ एकतर शेतमालाला भाव नाही. दुस-या बाजुला मोटारी चोरी गेल्याने शेतक-यांकडे नव्याने मोटारी घेण्यासाठी पैसे नाही. चोरी बंद व्हावी म्हणून आम्ही हे रस्ते तोडण्याचे काम हाती घेतले आहे. तोडलेले रस्ते बुजविण्याचे प्रयत्न केले तर संबंधीतांविरूध्द महसुल व पोलिस विभागाकडे तक्रार केली जाईल. - यादवराव तोडमल, शेतकरी


शेतक-यांनी केलेल्या मागणीनुसार रस्ते उखडण्यासाठी जेसीबी उपलब्ध करून देण्यात आला. त्यामुळे वाळू व विद्युत मोटारी चोरीला आळा बसेल.  कुणी रस्ता बुजविण्याचा प्रयत्न केल्यास संबंधीतांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात येईल.  यासंदर्भात शेतक-यांनी आमच्याकडे तक्रार करावी. तक्रारीची दखल घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल. - अनिल दौंडे, तहसीलदार राहुरी

 

Web Title: Farmers' Stunt: Sandwich Smile from Radish Water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.