छावणीला मंजुरी मिळत नसल्याने शेतक-याची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 3, 2019 11:38 AM2019-08-03T11:38:23+5:302019-08-03T16:03:22+5:30

नगर तालुक्यातील घोसपुरी येथील वसंत सदाशिव झरेकर (वय-५०) यांनी चारा छावणीला परवानगी मिळत नसल्यामुळे आज आत्महत्या केली.

Farmers suicide because the camp does not approval | छावणीला मंजुरी मिळत नसल्याने शेतक-याची आत्महत्या

छावणीला मंजुरी मिळत नसल्याने शेतक-याची आत्महत्या

केडगाव : नगर तालुक्यातील घोसपुरी येथील वसंत सदाशिव झरेकर (वय-५०) यांनी चारा छावणीला परवानगी मिळत नसल्यामुळे आज आत्महत्या केली.
चारा छावणी संदर्भात नगर-पुणे महामार्गावर शिवसेना व शेतक-यांनी रस्ता रोको केला होता. त्यावेळी या शेतक-याने चारा छावण्यांना मंजुरी न दिल्यास मी आत्महत्या करेन असे अधिका-यांसमोर सांगितले होते. कार्यकर्त्यांना व आंदोलकांना अटक करायला सुरुवात करताच त्याने आपला शर्ट फाडून घेतला होता. अद्यापही चारा छावणीला मंजुरी न मिळाल्याने आज झरेकर यांनी आत्महत्या केली.
याप्रकरणी तहसीलदार आणि निवासी उपजिल्हाधिकारी यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले आणि बाळासाहेब हराळ यांनी केली आहे. जोपर्यंत गुन्हे दाखल होत नाहीत तोपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.

Web Title: Farmers suicide because the camp does not approval

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.